छत्रपती संभाजीराजे यांचा कडक इशारा: विशाळगड अतिक्रमणाबाबत मतांचे राजकारण करू नका; अन्यथा शिवप्रेमी चांगलाच धडा शिकवतीलपुणे28 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही. आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे छत्रपती संभाजीराजे यांनी अभिनंदन केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल असा इशाराच दिला आहे.

Advertisement

छत्रपती संभाजीराजे यांनी दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडाची पाहणी करून जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात बैठक घेतली होती.

महाशिवरात्री पूर्वी अतिक्रमणे हटवा

Advertisement

या बैठकीत विशाळगडाचे अतिक्रमित रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था, संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते. मात्र लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली होती. छत्रपती संभाजीराजे यांच्यासह कोल्हापूर जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व बाजू ऐकून घेऊन अंतिमतः विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी निर्णय झालेला होता. तसेच महाशिवरात्री पूर्वी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

आमदार कोरे बैठकीस गैरहजर

Advertisement

या पार्श्वभूमीवर विशालगड अतिक्रमण बाबत शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी जिल्हा प्रशासनासोबत परस्पर बैठक बोलावली असल्याचे शिवप्रेमींच्या निदर्शनास आले. या बैठकीस विशाळगडाच्या अतिक्रमित रहिवाशांना निमंत्रण होते, मात्र कोणत्याही दुर्गप्रेमी संस्थेस याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नव्हती. यावर शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन मोठा रोष निर्माण करताच आमदार कोरे या बैठकीस आलेच नाहीत व बैठक रद्द झाली.

विशाळगडाची विषन्न अवस्था

Advertisement

यावर छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिलेला आहे. तसेच, आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झाल्याचेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

दुर्गप्रेमी शिवभक्तांचे अभिनंदन

Advertisement

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, गडावर चालू असलेल्या कारवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे, तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही, असा कडक इशारा देत आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवलीच पाहिजेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement