छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या भरतीत 432 जागांसाठी आले 18,500 अर्ज: अर्ज शुल्कातून जि.प. जवळपास दोन कोटी रुपयांचे उत्पन्न

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या भरतीत 432 जागांसाठी आले 18,500 अर्ज: अर्ज शुल्कातून जि.प. जवळपास दोन कोटी रुपयांचे उत्पन्न


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • 18,500 Applications For 432 Seats In Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad Recruitment; From The Application Fee, G.P. An Income Of Nearly Two Crore Rupees

छत्रपती संभाजीनगर14 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनग जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील रिक्त जागांसाठी ऑक्टोंबर मध्ये भरतीसाठी परीक्षा होणार आहे. यासाठी आयबीपीएस मार्फत परीक्षा होणार असून, ऑनलाइन पद्धतीने ऑगस्ट मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. यात एकूण 432 रिक्त पदांसाठी 18,500 अर्ज आले आहेत. या परीक्षेच्या अर्ज शुल्कातून जिल्हा परिषदेला जवळपास दोन कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. ऑक्टोंबर महिन्यात या भरतीसाठीची परीक्षा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून जागा रिक्त आहेत. या जागा ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येईल. असे पूर्वीच मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी म्हटले होते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात ही पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. उमेदवांराना एकूण 432 रिक्त पदंासाठी अर्ज करण्याकरिता 5 ते 25 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. या दिलेल्या मुदतीत जवळपास 18 हजार 500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सर्व संवर्गाच्या पदांकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000 रुपये आणि राखीव अथवा मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. यातून जवळपास दोन कोटी रुपये जिल्हा परिषदेला शुल्कापोटी मिळाले आहेत. या विविध पदांसाठीची परीक्षा बाह्य संस्थेमार्फत अथवा आयबीएसच्या माध्यमातून ऑनलाइन ऑक्टोंबर महिन्यात घेतली जाणार आहे.

असे आहेत आलेले अर्ज

Advertisement

आरोग्य सेवक – 1360

आरोग्य सेवक फवारणी – 1975

Advertisement

आरोग्यपरिचारिका – 1631

औषध निर्माण अधिकारी – 1761

Advertisement

कंत्राटी ग्रामसेवक – 2233

कनिष्ठ अभियंता – 2807

Advertisement

कनिष्ठ सहायक लिपिक – 2073

कनिष्ठ सहायक लेखा -226

Advertisement

वरिष्ठ सहायक – 84

वरिष्ट लिपिक – 284

Advertisement

पशुधन पर्यवेक्षक – 324

प्रयोगशाळा तंत्रज्ञ 147

Advertisement

– विस्तार अधिकारी 226

– सहायक स्थापत्य अभियांत्रिकी – 1122

Advertisement

– पर्यवेक्षक – 2147

– पर्यवेक्षिका – 2147

Advertisement

– लघुलेखक – 85। चौकट –

जिल्हा परिषदेची 2019 आणि 2021 ची पदभरती विविध कारणाने रद्द झाली होती. या मध्ये फॉर्म भरलेल्या परीक्षार्थीना फीस करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. यानुसार जिल्हा परिषदेकडून हे परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी परीक्षा फॉर्म भरलेल्या परीक्षार्थीनी https://maharddzp.com या संकेतस्थळावर बँक खाते क्रमांक आणि विचारलेली माहिती भरायची आहे.

AdvertisementSource link

Advertisement