छत्रपती संभाजीनगर8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कायम असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दोन ठिकाणी अपघात घडला. सिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गवळी शिवार आणि लासूर स्टेशन येथे घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत दोघेजण ठार झाले. या प्रकरणी वाहनचालकांविरोधात सिल्लेगाव पोलीस ठाण्यात 15 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिली घटना
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार पहिली घटना गवळी शिवार येथे रोड, रांजणगाव (तालुका गंगापूर) येथे घडली. भरधाव पिकपअची रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचाऱ्याला धडक बसली. या अपघातात संतोष कडूबा फाळके (वय 30, रा. रांजणगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किरण फाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाहन क्रमांक (एम. एच . 20, डी. सी. 0436) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
दुसरी घटना
दुसरी घटना अण्णाभाऊ साठे चौक लातूर स्टेशन येथे घडली. भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने हुसेन पठाण (राहणार मंजरपूर,सिल्लेगाव तालुका गंगापूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक शुभम आगवान (राहणार ताडपिंपळगाव, तालुका कन्नड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
उघड्यावर मास विक्री, तिघांवर गुन्हा
उघड्यावर मांस विक्री केल्याप्रकरणी तिघांवर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात पंधरा मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मजहर अकबर कुरेशी, जमील अब्बास कुरेशी अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला.