छत्रपती संभाजीनगर11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
दुष्काळ जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर टोमँटो टाकून निषेध आदोलन करण्यात आले आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असतांना शासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे पाऊल उचलले जात आहे.त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
संपूर्ण मराठवाडा विभागात छत्रपती संंभाजीनगर जिल्हयात या वर्षी पाऊस खूप कमी पडला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी शहरअध्यक्ष शरफोद्दीन ख्वाजाभाई, सुधाकर सोनवणे, छाया जंगले, द्वारका पाथरीकर, पाडुरंग तांगडे, रविंद्र तांगडे,डॉ.धैर्यशील पवार, प्रशांत जगताप,यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
टोमँटो फेकून व्यक्त केला संताप
ग्रामिण भागात शेतकऱ्यांनी शेतीला चांगला भाव चांगला मिळेल म्हणून टोमँटोची लागवड करण्यात आली होती. मात्र भाव मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जवळपास पंंधरा किलो टोमँटो आणून फेकून दिले. कर्ज घेवून टोमँँटोची लागवड केली आणि आता खर्चही निघत नसल्याचा राग यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
या करण्यात आल्या मागण्या
संपुर्ण जिल्हयात पाऊस नसल्याने त्वरीत “दुष्काळ” जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करण्यात यावी. मराठवाडा विभागातील सर्व जनतेची संपुर्ण विजबिल माफी करण्यात यावी.शेतकऱ्यांचे विमा कंपन्या पैसे देत नाही त्यामुळे त्वरीत विमाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळाले नाही ते त्वरीत देण्यात यावे. बँकाकडून होणारी सक्तीची कर्ज वसुली त्वरीत थांबवावी. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा. आदर्श महिला नागरी सहकारी बँक व सहकारी पतसंस्था यामध्ये अडकलेल्या खातेदारांचे पैसे त्वरीत परत देण्यात यावे. फळबागांना अनुदान प्राप्त होत नाही. ते सरसकट देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी असणारे “पाणंद रस्ते बांधण्यात यावेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्राधान्याने सोडवावा यासह विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे.