छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक: बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; संजय राऊत यांनीही घेतला पास

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक: बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; संजय राऊत यांनीही घेतला पास


छत्रपती संभाजीनगर3 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठवाड्याच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक आज होत आहे. आमखास मैदानाजवळील स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 29 मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी कालपासूनच काही मंत्र्यांनी शहरात ठाण मांडले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सकाळीच शहरात दाखल झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाशेजारील वंदे मातरम सभागृहात मनपाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घटन तसेच काही लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे.

Advertisement

मराठवाड्यात सात वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या निमित्त सर्वच मंत्री शहरात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह मंत्रिमंडळाची बैठक व मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त शहरातील प्रमुख रस्तेही बंद आहेत.

लाईव्ह अपडेट्स

Advertisement
  • मी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आणि जन्मापासून वार्ताहर आहे. मला वाटले तर मी मुख्मयंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
  • मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पास घेतला असल्याची पोलिस आयुक्तालयातील सुत्रांची माहिती
  • मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आदी महत्त्वाच्या नेत्यांचीही वंदे मातरम सभागृहात आयोजित कार्यक्रमाला हजेरी
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. वंदे मातरम् सभागृहात मनपाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन

  • मुख्यमंत्री सकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत वंदे मातरम सभागृहात मनपाकडून आयोजित कार्यक्रमांचे उद्घाटन करतील.
  • सकाळी 10.50 वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन.
  • सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत मंत्रिमंडळ बैठक.
  • दुपारी 2 ते 3 पत्रकार परिषद.Source link

Advertisement