मुंबई41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा ऐतिहासिक ठेवा असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ब्रिटमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतीक कार्यमंत्री महिनाअखेर लंडनला जाणार आहेत. याच वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला होता. ही वाघनखे ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात आहे. आता ही वाघनखे परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी ती परत देण्यास मंजूरी दिली आहे. शिवरायांची वाघनखे परत आणण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक करार करणार आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची ही वाघनखे सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट या संग्रहालयात आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखे परत करण्याबाबत ब्रिटनच्या आधिकाऱ्यांनी होकार कळवला आहे. मात्र, त्यासाठी एक करार करावा लागणार आहे. त्यासाठीच राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या महिनाअखेरीस लंडनला जाणार आहेत. या करारानंतर ही वाघनखे या वर्षाअखेर भारतात परत येण्याची शक्यता आहे.
वर्धापनी भारतात आणणार
या संबंधीचे पत्र आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून मिळाले असल्याचे विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नाखे परत देण्याचे ब्रिटनने मान्य केले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तारखेला अफझलखानाला मारले त्या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला ते परत मिळू शकतील, असा प्रयत्न आहे. त्या शिवाय इतरही काही तारखांचाही विचार केला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. तसेच वाघनखे परत आणण्याची पद्धतही ठरवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
राज्यासोबत सामंजस्य करार
ही वाघनखे परत भारतात आणण्यासाठी ब्रिटनसोबत सामंजस्य करार करावा लागणार आहे. इतकेच नाही तर या दौऱ्यात सुधीर मुनगंटीवार हे शिवरायांची जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तू देखील पाहणार आहोत. ज्या यूकेमध्ये प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत. अफझलखानच्या वधाची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित 10 नोव्हेंबर आहे परंतु आम्ही हिंदू तिथी कॅलेंडरनुसार तारखा ठरवत असल्याचे, सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.