छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी: ब्राह्मण समाजावरील वादग्रस्त विधानानंतर अज्ञाताने केला फोन; नाशिक पोलिसांकडून तपास सुरू

छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी: ब्राह्मण समाजावरील वादग्रस्त विधानानंतर अज्ञाताने केला फोन; नाशिक पोलिसांकडून तपास सुरू


नाशिक7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ब्राह्मण समाज व देवतांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला आहे. अज्ञाताने फोन करून तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यासंदर्भात भुजबळ यांच्या कार्यालयाकडून नाशिक पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. ज्या फोन क्रमांकावरून धमकी आली त्याबाबतची सर्व माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

वादग्रस्त विधानामुळे भुजबळ चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच नाशिक येथील कार्यक्रमात ब्राह्मण समाजावर व्यक्तीश: टीका केली. भुजबळ म्हणाले होते की, ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावं ठेवत नाहीत. काही लोकांना सरस्वती तर काही लोकांना शारदा आवडते. परंतू महात्मा ज्योतिबा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. आम्ही कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही, असे ते म्हणाले होते.

Advertisement

हिंदु महासंघाकडून जोरदार टीका

त्यांच्या या विधानानंतर विविध संघटनांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. दवे म्हणाले, छगन भुजबळांनी आज पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. मुळात भुजबळ यांचं हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीला बदनाम करण्याचं धोरण का असतं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. तसेच भुजबळ यांनी त्यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावाचे लोक आहेत ते सांगावं.

Advertisement

भुजबळांच्या कानाखाली देणाऱ्याला बक्षीसाची घोषणा
भुजबळांच्या वादग्रस्त विधानानंतर परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी थेट भुजबळांना आव्हान दिले होते. ते म्हणाले की, जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती.

पोलिसांकडून तपास सुरू
तर आता पुन्हा भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला आहे. त्यामुळे यासंदर्भातील माहिती नाशिक पोलिसांना देण्यात आली आहे. ज्या नंबरवरून फोन आला. त्या फोननंबरवरून पोलिस पुढील तपास करत आहेत.

AdvertisementSource link

Advertisement