चौथा प्ले ऑफमध्ये पोहोचणार संघ, पण नेमका कोण दिल्ली कॅपिटल्स का रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू…

चौथा प्ले ऑफमध्ये पोहोचणार संघ, पण नेमका कोण दिल्ली कॅपिटल्स का रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू...
चौथा प्ले ऑफमध्ये पोहोचणार संघ, पण नेमका कोण दिल्ली कॅपिटल्स का रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू...

आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ३१ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दिल्लीने १५ तर मुंबईने १६ जिंकले आहेत. दोन्ही संघ भारतात २३ सामने खेळले आहेत, त्यापैकी दिल्लीने ११ आणि मुंबईने १२ जिंकले आहेत. आयपीएल २०२२ मधील आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

या मोसमातील प्ले ऑफमध्ये पोहोचणार चौथा संघ कोणता असेल हे आज मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्याचा निकाल ठरवेल. हा सामना जिंकल्यानंतर दिल्लीला आयपीएल २०२२ च्या प्ले ऑफचे तिकीट मिळेल तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला घरी परतावे लागेल. अशा परिस्थितीत, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात कोणत्या संघाचा दबदबा आहे ते जाणून घ्या.

Advertisement

दिल्ली विरुद्ध मुंबई Head-to-Head

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दिल्लीने १५ तर मुंबईने आणखी १६ सामने जिंकले आहेत. भारतात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आतापर्यंत २३ सामने खेळले आहेत, त्यापैकी दिल्लीने ११ तर मुंबईने १२ खिशात घातले आहेत. त्याचबरोबर यूएईमध्ये दिल्ली आणि मुंबई ८ वेळा आमनेसामने आले असून दोन्ही संघांनी ४-४ सामने जिंकले आहेत.

Advertisement

पिच रिपोर्ट

वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकणे आणि प्रथम गोलंदाजी निवडणे ही योग्य गोष्ट आहे, कारण या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला १८० किंवा अधिकची धावसंख्या उपयुक्त ठरेल.

Advertisement

MI vs DC संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, रमणदीप सिंह, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे

Advertisement

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ/सरफराज खान, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिय.

Advertisement