चौका, पाल फाट्यावर साडेचार हजाराहून अधिक नागरिकांचा रास्ता रोको: दीड KMपर्यंत वाहनांच्या रांगा; मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

चौका, पाल फाट्यावर साडेचार हजाराहून अधिक नागरिकांचा रास्ता रोको: दीड KMपर्यंत वाहनांच्या रांगा; मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी


औरंगाबाद6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आंतरवाली सराटी येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने त्वरीत मार्गी लावावा, यासाठी ५० खेड्यातील साडेचार हजाराहून अधिक नागरिकांनी जळगाव रोडवरील चौका व पाल फाटा येथे लक्षवेधी रस्ता रोको आंदोलन केले. सरकारने आरक्षण द्यावे, अन्यथा पाय उतार व्हावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प होवून दीड ते दोन किमीवर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Advertisement

चौका येथे 25 खेड्यातून लोक जमले होते. या आंदोलनात महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. 11 ते 12.30 असे दीडतास चौका फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, सिल्लोड, अजिंठा, जळगाव रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे दोन हजार मराठा बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतल्याची माहिती समन्वयक सतीश वेताळ पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

एक मराठा लाख मराठा, देत कसे नाही घेतल्याशिवाय राहत नाही, सरकार आरक्षणाचा निर्णय घ्यावा नाहीतर चालते व्हावे, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. तर पाल फाटा येथे 35 खेड्यातून अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी 12 ते 3 वाजेपर्यंत रस्ता रोके व ठिय्या, निदर्शने आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त असून सरकार निर्णय घेण्यास वेळखाऊ धोरण राबवत असल्याची टिका आंदोलकांनी केली.

Advertisement

हे ठरले लक्षवेधी

अनेक आंदोलकांनी भगवी टोपी व त्यावर एक मराठा लाख मराठा लिहिले होते. भगवा शिवध्वज हातात घेऊन आंदोलकांनी सरकार विरोधात तीव्र निदर्शने दिली. यामुळे संपूर्ण जळगाव रोड परिसर दणाणून गेला होता. तरूणांनी अर्धनग्न आंदोलन केले.

Advertisement

मराठा आरक्षण मिळेपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जरांगे यांच्या तब्येतीला काही झाले तर सरकारला सळो की पळो करून सोडू असा निर्वाणीचा इशाराही आंदोलकांनी दिला.Source link

Advertisement