पुणे12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गप्पा मारत असताना सुरु असलेल्या चेष्टा मस्करीचा राग आल्याने मित्राच्या चुलत्याकडून तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीररित्या जखमी करण्यात आले. ही घटना मार्केटयार्डातील संदेशनगरमध्ये घडली आहे.
गणेश वाघमारे (वय 18), योगिराज वाघमारे (वय 40), धनराज वाघमारे (वय 50, सर्व रा. भिमाले कॉम्पलेक्स, मार्केटयार्ड) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत सोमनाथ शिंदे (वय 25, रा. भिमाले कॉम्प्लेक्स, संदेशनगर, मार्केटयार्ड) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत आणि आरोपी गणेश वाघमारे हे मित्र 5 सप्टेंबरला सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये मस्करी सुरू असल्यामुळे गणेशला राग आला. त्याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. आरोपी गणेश, योगीराज, धनराजने मिळून हनुमंतच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. योगीराज वाघमारे याने बांबुने तर धनराज वाघमारे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.
अल्पवयीनाकडून तरूणावर खुनी हल्ला
हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेताना धक्का लागल्याने 16 वर्षाच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले आहे. भांडणात मध्यस्थी करणार्यावरही वार करण्यात आला. ही घटना बिबवेवाडीतील पासलकर चौकामील संगम हॉटेलसमोर घडली. अझर आमीर हंमजा शेख (वय 30, रा. अप्पर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार कोंढव्यातील 16 वर्षाचा मुलगा व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.