चेल्सी क्लबची मालकी तीन अब्ज डॉलर रकमेला लॉस एंजेलिस डॉजर्सकडे | Chelsea club owns dollar 3 billion Los Angeles Dodgers Shareholders company ysh 95एपी, लंडन : प्रीमियर लीग फुटबॉलमधील चेल्सी क्लबची मालकी तीन अब्ज डॉलर रकमेला लॉस एंजेलिस डॉजर्सने मिळवली आहे. टॉड बोएहली हे या कंपनीचे भागधारक आहेत. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियाच्या रोमन अब्रामोव्हिच यांच्या निर्बंध लादण्यात आल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव क्लबची मालकी सोडावी लागली. ‘फिफा’ क्लब विश्वचषक विजेत्या आणि २०२१मधील युरोपियन विजेत्या संघाची विक्री २.५ अब्ज पौंडला (३.१ अब्ज डॉलर) करण्यात आली आहे. जागतिक संघविक्रीमधील हा विक्रमी आकडा मानला जातो. या विक्रीतून इब्रामोव्हिच यांना कोणताही फायदा होणार नाही. कारण या व्यवहारातून युद्धात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी कार्यरत संस्थांना निधी द्यावा, असा पर्याय इब्रामोव्हिच यांनी सुचवला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून दोन महिन्यांच्या वाटाघाटीनंतर पश्चिम लंडनमधील चेल्सी क्लब विकला गेला. विक्रीच्या रकमेतील १.७५ अब्ज पौंड (२.२ अब्ज डॉलर) संघासाठी आणि स्टेडियमसाठी वापरले जातील.

Advertisement

प्रीमियर लीगने चेल्सीच्या नव्या मालकी कराराला मंजुरी देण्याची आणि सरकारने त्यांचा व्यवसाय करार ३१ मेपर्यंत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण अब्रामोव्हिचच्या गोठवलेल्या मालमत्तेत चेल्सीचाही समावेश आहे.

Source link

Advertisement