चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी जडेजा ऐवजी दुसरा खेळाडू असायला हवा, शास्त्रींनी मांडले मत

चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी जडेजा ऐवजी दुसरा खेळाडू असायला हवा, शास्त्रींनी मांडले मत
चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी जडेजा ऐवजी दुसरा खेळाडू असायला हवा, शास्त्रींनी मांडले मत

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊ दोन आठवडे झाले आहेत. या हंगामातील सर्वच सामने रोमहर्षक होत असून वेगवेगळ्यां संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. असे असले तरी दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी आतापर्यंतचे सर्वच सामने गमावले आहेत. एकाही सामन्यात विजय प्राप्त करता न आल्यामुळे चेन्नई संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. दरम्यान, चेन्नईची अशी दुर्दशा झालेली असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आणि चेन्नईच्या कर्णधारपदावर मोठं भाष्य केलंय. त्यांनी रविंद्र जाडेच्या जागेवर दुसरा खेळाडू कर्णधार असायला हवा होता, असं म्हटलंय.

सध्या चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. सीएसकेच्या अशा वाईट स्थितीवर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक विधान केलं आहं ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या टी-२० टाईम आऊट शोमध्ये बोलताना माजी प्रशिक्षक म्हणाले की, “सीएसकेनं रवींद्र जडेजाला कर्णधार करण्याची चूक केली. जडेजासारख्या खेळाडूने आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला हवं होतं. जडेजाला कर्णधारपदी नियुक्त करून सीएसकेनं चुकीचा निर्णय घेतला आहे”

Advertisement

‘मला असं वाटतं की जडेजासारख्या खेळाडूचं संपूर्ण लक्ष फक्त क्रिकेटवर असलं पाहिजे, चेन्नईनं फॅफ ड्यू प्लेसिसला संघातून वगळून मोठी चूक केली आहे. सीएसकेने ड्यू प्लेसिसला कर्णधार बनवायला हवं होतं. धोनीला संघाचं कर्णधारपद द्यायचं नव्हतं, तर ड्यूप्लेसिसकडे जबाबदारी देता आली असती. जडेजानं केवळ एक खेळाडू म्हणून खेळायला हवं होतं जेणेकरून हा खेळाडू खुल्या मनानं मैदानात उतरू शकेल. कोणतेही दडपण न घेता त्याला खेळता आलं असतं. कर्णधारपदाच्या दडपणाचा जडेजाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे”, असं रवी शास्त्री म्हणाले.

सीएसकेसाठी या हंगामात काहीही चांगलं घडताना दिसत नाहीय. संघाला सतत पराभवाला सामोरे जावं लागत आहे. सीएसकेला दीपक चहरची उणीव जाणवत आहे. फलंदाज फॉर्मात नाहीत. ऋतुराजचा सततचा फ्लॉप संघासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे हे दोनच फलंदाज आहेत जे सीएसकेसाठी धावा करत आहेत. दुसरीकडे गोलंदाजीतही संघाची कामगिरी देखील चांगली दिसत नाही. ब्राव्होने आतापर्यंत फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत, जडेजाच्या फिरकीची जादूही चालत नाहीये. तर मोईन अली देखील अद्याप संघात दिसलेला नाही. आता सीएसके त्यांचा पुढचा सामना १२ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी खेळणार आहे.

Advertisement