चेन्नई सुपर किंग्सच्या एका फलंदाजाने निवृत्तीचे ट्विट १५ मिनिटात डिलीट; अकाऊंट हॅक आरोप

चेन्नई सुपर किंग्सच्या एका फलंदाजाने निवृत्तीचे ट्विट १५ मिनिटात डिलीट; अकाऊंट हॅक आरोप
चेन्नई सुपर किंग्सच्या एका फलंदाजाने निवृत्तीचे ट्विट १५ मिनिटात डिलीट; अकाऊंट हॅक आरोप

एखादी स्पर्धा किंवा मालिका सुरू असताना खेळाडूने निवृत्ती घेण्याची घटना नवी नाही. पण सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्यानंतर १५ मिनिटात पोस्ट डिलीट करण्याचा प्रकार घडला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या मधळ्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने शनिवारी एक ट्विट करून सर्वांना धक्का दिला. दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्याने ही अखेरची आयपीएल असेल असे म्हटले होते. या ट्विटची चर्चा सुरू झाली तोपर्यंत १५ मिनिटात त्याने निवृत्तीची हे ट्विट डिलीट देखील केले. या सर्व प्रकरणानंतर चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी खुलासा केलाय.

काय म्हणाला होता रायडू…

Advertisement

रायडूने ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मला तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की हे माझे शेवटचे आयपीएल असणार आहे. या लीगमध्ये मी दोन संघाकडून खेळताना गेल्या १३ वर्षात खुप आनंद घेतला. या प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचे मनापासून धन्यवाद. रायडूच्या या पोस्टनंतर १५ मिनिटात त्याने संबंधित निवृत्तीची पोस्ट डिलिट केली. पण तोपर्यंत जवळ जवळ ८ हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी रायडूच्या निवृत्तीवर खुलासा केला. ते म्हणाले, असे काही नाही. रायडू निवृत्त नाही झाला. असे देखील असू शकते की तो स्वत:च्या कामगिरीवर नाराज असेल. त्यामुळे दबावात निर्णय घेतला असेल. तो आमच्या सोबत असेल आणि पुढील वर्षी सीएकसेचा भाग राहिल.

Advertisement

अकाउंट हॅक झाले?

रायडूचे हे ट्विट हॅक करून टाकले गेले असावे अशी देखील चर्चा आहे. कारण २०२०नंतर त्याचे हे पहिलेच ट्विट आहे. त्यामुळेच ही शंका अनेकांना वाटते. २०२०नंतर करण्यात आलेले हे ट्विट काही मिनिटात डिलिट करण्यात आले. या ट्विटची भाषा देखील फार साधी होती. साधारण खेळाडू अशा प्रकारची भाषा वापरत नाहीत. यात आयपीएल आणि सीएसके या शब्दांचे स्पेलिंग चुकले होते. पोस्टच्या सुरुवातीला मला आनंद होतोय की ही माझी अखेरची आयपीएल असेल. साधारण खेळाडू निवृत्त होतो तेव्हा त्यासाठी भावनिक क्षण असतो.

Advertisement

आयपीएल २०२२मध्ये रायडूने १२ सामन्यात १२४.३१च्या स्ट्राइक रेटने २१७ धावा केल्या. एकूण आयपीएलमध्ये १८७ सामन्यात त्याने ४ हजार १८७ धावा केल्या आहेत. यात १ शतक आण २२ अर्धशतकांचा समावेश आहे. रायडूने ३४९ चौकार आणि १६४ षटकार मारलेत.

Advertisement