चेन्नई सुपर किंग्जचा हा स्टार खेळाडू आयपीएलला मुकण्याची शक्यता

चेन्नई सुपर किंग्जचा हा स्टार खेळाडू आयपीएलला मुकण्याची शक्यता
चेन्नई सुपर किंग्जचा हा स्टार खेळाडू आयपीएलला मुकण्याची शक्यता

दुखापतीमुळे आयपीएलच्या १५व्या हंगामात अद्याप मैदानात उतरू न शकलेल्या दीपक चहराबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा हा स्टार खेळाडू आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. एका पाठोपाठ ४ सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर आता सीएसकेला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार संघातील स्टार गोलंदाज दीपक चहर संपूर्ण हंगामातून बाहेर होऊ शकतो. गेल्या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा संघ चार लढतीनंतर देखील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. चहर शिवाय संघाच्या गोलंदाजीत धार दिसत नाहीय. अशाच चहरचे दुखापतीतून बाहेर न येणे आणि स्पर्धेतून बाहेर होणे चेन्नईसाठी मोठा सेटबॅक ठरणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात २० तारखेला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या टी-२० सामन्यात दीपकला दुखापत झाली होती. त्यानंतर तो थेट बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला. आयपीएल २०२१ मध्ये दीपकने १५ सामन्यात १४ विकेट घेतल्या होत्या. दीपकसाठी चेन्नईने मेगा लिलावात १४ कोटींची बोली लावली होती. दीपक फक्त गोलंदाजी करत नाही तर तळात फलंदाजीद्वारे कमाल करू शकतो. आयपीएलमध्ये दीपकने आतापर्यंत ६३ लढतीत ५९ विकेट घेतल्या आहेत. १३ धावात ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Advertisement

आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच चेन्नईला धक्का बसला होता. पण तेव्हा दीपक सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही असे वृत्त होते. पण आता तो संपूर्ण हंगाम संघाबाहेर राहणार असल्याचे समजते. चेन्नईवर पहिल्या चार लढती गमवण्याची वेळ आली आहे. आयपीएलच्या इतिहासात आजवर असे कधीच झाले नाही.

आयपीएल २०२२ मधील चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी

Advertisement

 केकेआरविरुद्ध ६ विकेटनी पराभव

 लखनौविरुद्ध ६ विकेटनी पराभव

Advertisement

 पंजाब किंग्जविरुद्ध ५४ धावांनी पराभव

 सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ८ विकेटनी पराभव

Advertisement