चेन्नईच्या वळणावर मुंबईची वाटचाल सुरु डोस्याला वडापावची साथ

चेन्नईच्या वळणावर मुंबईची वाटचाल सुरु डोस्याला वडापावची साथ
चेन्नईच्या वळणावर मुंबईची वाटचाल सुरु डोस्याला वडापावची साथ

मुंबई इंडियन्सने आज चेन्नई सुपर किंग्जच्या हातावर हात मारला. मुंबईला यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबईचे १५२ धावांचे आव्हान ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १९ व्या षटकात पार केले. आरसीबीकडून सलामीवीर अर्जुन रावतने दमदार फलंदाजी करत ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याला विराट कोहलीने ४८ धावा करून चांगली साथ दिली. तत्पूर्वी मुंबईकडून सूर्यकुमार यादव एकटा भिडला. त्याने केलेल्या ६८ धावांच्या जोरावर मुंबई १५१ धावांपर्यंत मजल मारू शकली.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर १५२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं ९ चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.

इशान किशन ( २६), रोहित शर्मा ( २६), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ८), तिलक वर्मा (०), किरॉन पोलार्ड ( ०) व रमणदीप सिंह ( ६) हे आज अपयशी ठरले. RCB कडून हर्षल पटेल ( २-२३) व वनिंदू हसरंगा ( २-२८) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक अप्रतिम धावबाद केला आणि आकाश दीपने एक बळी टिपला. प्रत्युत्तरात अनुज रावत आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिले षटक संयमाने खेळून काढल्यानंतर दुसऱ्या षटकानंतरच फटकेबाजी सुरू केली. रावतने दुसऱ्या षटकात जयदेव उनाडकतला मारलेले दोन खणखणीत षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. रावतची फटकेबाजी आणि फॅफचा संयमी खेळ याने मुंबईचे गोलंदाज हैराण झाले होते. या दोघांनी ८ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. उनाडकतने ९व्या षटकात फॅफल ( १६) बाद केले. त्याआधी किरॉन पोलार्डने रावतला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली आणि हीच विकेट मुंबईला महागात पडली. रावत व विराट कोहली यांनीही तुफान फटकेबाजी केली. १७व्या षटकात रावत धावबाद झाला. त्याने ४७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांनी ६६ धावांची खेळी केली. त्याने विराटसह ५२ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली.

Advertisement

बेंगलोर संघाचा डाव

बेंगलोर संघाकडून फलंदाजी करताना अनुज रावतने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या धावा करताना २ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहलीने ४८ धावा ठोकल्या. यामध्ये ५ चौकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार डू प्लेसिसने १६ धावा केल्या. तसेच, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेलने अनुक्रमे ७ आणि ८ धावा केल्या. मॅक्सवेलने विजयी चौकार मारला.

Advertisement

यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जयदेव उनाडकटला आणि डेवाल्ड ब्रेविसला विकेट घेण्यात यश आले. त्याने बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसची विकेट घेतली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा दिल्या होत्या. ब्रेविसने विराट कोहलीला ४८ धावांवर तंबूत पाठवले.

Advertisement