चुलत भावाच्या मदतीने‎ दारुड्या वडिलांचा खून‎: दोघांना अटक; तरोडा शिवारात आढळला होता मृतदेह‎


प्रतिनिधी | अमरावती /‎ धामणगाव3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

रेल्वे‎ वडील दारू पिऊन घरात‎ वारंवार वाद करतात. त्यांच्या याच‎ त्रासाला कंटाळून मुलाने चुलत‎ भावाच्या मदतीने वडिलांचा खून‎ केला. या प्रकरणी ग्रामीण दलाच्या‎ पोलिसांनी मृताच्या मुलासह‎ पुतण्याला शनिवारी (दि. २०)‎ उशिरा रात्री अटक केली आहे. ही‎ घटना कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतील‎ तरोडा शिवारात शनिवारी सकाळी‎ उघड झाली होती.‎ सतीश गंगाधर कुरटकार (४२,‎ रा. जळगाव आर्वी, धामणगाव‎ रेल्वे) असे मृताचे, तर अभी‎ सतीश कुरटकार (१९, रा.‎ जळगाव आर्वी) आणि यश‎ जगदिश कुरटकार (१ ९,‎ रा.खडक सावंगा बाभुळगाव)‎ अशी मारेकऱ्यांची नावे आहे.‎

Advertisement

सतीश कुरटकार यांचा मृतदेह‎ आढळल्यानंतर पोलिसांनी मृताची‎ ओळख पटवली. त्यानंतर‎ कुरटकार यांच्या गावात जाऊन‎ माहिती घेतली तसेच‎ कुटुंबीयांसोबत चर्चा केली.‎ त्यावेळी १९ मे रोजी सकाळी‎ सतीश यांचा कुटुंबीयांसोबत वाद‎ झाल्याचे समोर आले. यापूर्वीही‎ अनेकदा सतीश दारू पिऊन घरात‎ वाद घालायचे. यापूर्वी यशच्या‎ आईसोबत सुध्दा सतीश यांनी वाद‎ घालून त्यांच्या अंगावर धाव‎ घेतली होती. त्यामुळे यश आणि‎ अभीने सतीश यांचा काटा‎ काढण्याचा कट आखला.‎ दरम्यान, १९ मे रोजी सायंकाळी‎ अभी आणि यश हे सतीश यांना‎ बाहेर नाश्ता करण्यासाठी घेऊन‎ गेले. त्यानंतर रात्री नऊ वाजताच्या‎ सुमारास तरोडा परिसरात पोहोचले.‎ त्याठिकाणी अभी आणि यश या‎ दोघांनी कुऱ्हाड आणि चाकूने‎ सतीश यांच्यावर वार करुन त्यांचा‎ खून केला आणि ते घरी निघून‎ आलेत. दरम्यान, २० मे रोजी‎ सकाळी तरोडा शिवारात अनोळखी‎ मृतदेह आढळला. ही माहिती कुऱ्हा‎ पोलिसांना मिळताच त्यांनी‎ घटनास्थळी जाऊन पाहणी केली‎ तसेच सोशल मीडियाच्या मदतीने‎ मृताची ओळख पटवली. त्यानंतर‎ तपासचक्रे फिरवून यश आणि‎ अभीला ताब्यात घेतले. ही कारवाई‎ एलसीबीचे पीआय तपन कोल्हे,‎ पीएसआय मुलचंद भांबुरकर,‎ पुरूषोत्तम यादव, मंगेश लकडे,‎ सचिन मसांगे, मंगेश यांनी केली.‎



Source link

Advertisement