चुकून दुसऱ्यांच्या खात्यात पाठवले 1300 कोटी रुपये, पैसे परत करण्यास खातेधारकांचा नकार


  Advertisement

  Trending News : बँकेने चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक घटना घडली आहे. मात्र, ही रक्कम 1-2 लाख नाही तर एक हजार 300 कोटी रुपये इतकी आहे. ही घटना युकेमध्ये घडली आहे. युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) सँनटेंडर बँकेने (Santander Bank) अशी चूक केली असून आता हे पैसे परत मिळवण्यात बँक अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. ज्यांच्या खात्यात हा पैसे गेला ते खातेधारक पैसे परत करण्यास तयार नाहीत. 

  25 डिसेंबर रोजी घडली घटना
  मिळालेल्या रिपोर्टनुसार, 25 डिसेंबर रोजी सॅनटेंडर बँक काही व्यवहार करत असताना 75 चुकीच्या खात्यांमध्ये 130 दशलक्ष पौंड म्हणजेच 1300 कोटी रुपये चुकून ट्रान्सफर झाले. विशेष म्हणजे हे पैसे त्याच्या स्वत:च्या ग्राहकांच्या खात्यात नाही तर प्रतिस्पर्धी बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात जमा झाले. या बँकांमध्ये बार्कलेज (Barclays), एचएसबीसी (HSBC), नॅटवेस्ट (NatWest), को-ऑपरेटिव्ह बँक (Co-operative Bank) आणि व्हर्जिन मनी (Virgin Money) यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

  Advertisement

  तांत्रिक बिघाडामुळे घडला प्रकार
  या चुकीनंतर बँकेचे अधिकारी पैसे परत मिळवण्यासाठी या ग्राहकांशी सतत संपर्क करत आहेत, मात्र हे खातेधारक पैसे परत करण्यास तयार नाहीत. त्यामुळे बँक अधिकारी चांगलेच निराश झाले आहेत. अशा परिस्थितीत आता पैसे परत मिळवण्यासाठी बँकेकडे फक्त कायदेशीर पर्याय उरला आहे. हा सर्व व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

  यूकेमधील कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये जर बँकेच्या चुकीमुळे ग्राहकाच्या खात्यात पैसे आले असतील तर ग्राहकांना बँकेला पैसे परत करावे लागतील. जर कोणी पैसे परत करण्यास नकार दिला तर त्याला जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

  Advertisement

  काही प्रकरणांमध्ये पैसा अडकतो
  अशी चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अमेरिकेच्या सिटी बँकेकडूनही अशीच चूक झाली होती. सिटी बँकेने चुकून 900 दशलक्ष डॉलर्स कॉस्मेटिक कंपनी रेव्हलॉनच्या कर्जदारांना ट्रान्सफर केले होते. या प्रकरणात बँकेकडून फक्त  500 दशलक्ष डॉलर वसूल होऊ शकले. यानंतर सिटी बँकेने न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने सिटी बँकेला वसुली करू देणार नाही, असे सांगत खटला फेटाळून लावला.

  महत्त्वाच्या बातम्या :

  Advertisement

  LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

  Advertisement  Source link

  Advertisement