चीनच्या दुष्प्रचारावर भारताचा पलटवार: चीनच्या व्हिडिओच्या उत्तरात भारताने जारी केला फोटो; तिरंग्यासह 30 सशस्त्र भारतीय सैनिक LAC वर तैनात


  • Marathi News
  • National
  • India China Border Update; Indian Army Soldiers Unfurls Flag In Galwan Valley On New Year 2022

Advertisement

9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या निमित्ताने गलवानमध्ये भारतीय झेंडा फडकवण्यात आला. याचा फोटो समोर आला आहे, मात्र अद्याप आर्मीने या फोटोची पुष्टी केलेली नाही. एएनआय या न्यूज एजेंसीने सिक्योरिटी सूत्रांच्या हवाल्याने दोन फोटो जारी केले आहे. फोटोंमध्ये सैन्याचे 30 जवान तिरंग्यासोबत दिसत आहेत. जवान हत्यार घेऊन उभे आहेत. एक तिरंगा भारतीय चौकीत फडकत आहे आणि दुसरा तिरंगा जवानांच्या हातात आहे.

Advertisement

गलवानमध्ये पीएलए सैनिक चीनचा ध्वज फडकावत राष्ट्रगीत गात आहेत असा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर हे फोटोज समोर आले आहेत. आता भारतीय जवानांचा फोटो हा गलवानमध्ये चीनच्या दुष्प्रचाराचे उत्तर म्हणून पाहिला जात आहे. ज्यामध्ये LAC वर भारतीय सशस्त्र जवान तैनात असल्याचे दिसत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, भारतीय सेना आणि चीनी जवानांनी पश्चिम लडाखमध्ये एकमेकांना मिठाई वाटली. हॉट स्प्रिंग्स, डेमचोक, नाथूला आणि कोंगरा लॉ परीसरात दोन्हीकडून मिठाईचे वाटप केले जात आहे.

Advertisement

चिनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी झाला : चीनच्या एका व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरुन गलवानमध्ये चीनी झेंडा फडकतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते – 2022 च्या पहिल्या दिवशी गलवान घाटावर चीनचा झेंडा फडकला होता. हा झेंडा खास आहे, कारण हे बीजिंगच्या तियानमेन स्क्वायरवरही फडकवण्यात आला होता.

राहुलने मोदींना मागितले होते उत्तर
यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लिहिले होते – गलवानवर आमचा तिरंगाच चांगला दिसतो. चीनला उत्तर द्यावे लागेल. मोदी जी, मौन सोडा !

Advertisement

भारतीय सैन्याने दिले उत्तर
चीनी व्हिडिओवर वाद वाढल्यानंतर भारताने म्हटले की, चीनने गलवान घाटीच्या ज्या भागात तिरंगा फडकवला, तो परिसर नेहमी त्यांच्याच ताब्यात राहिला आहे आणि या क्षेत्राविषयी कोणताही नवीन वाद नाही. भारतीय सैन्याशी संबंधी सूत्रांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement