एका तासापूर्वी
- कॉपी लिंक
महिन्याला शंभर कोटींची खंडणी घेणारं, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीननं भरलेली गाडी ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा काळाकुट्ट कालखंड संपला आहे, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
वाघ यांनी शिवसेना उपनेता डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
काय म्हणाल्या वाघ?
चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणतात की, दर महिन्याला शंभर कोटींची खंडणी घेणारं, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीननं भरलेली गाडी ठेवणारं, प्रत्येक प्रकल्पामध्ये दहा टक्के कमिशन घेणारं, महाविकास आघाडीचा हा अडीच वर्षांचा काळाकुट्ट कालखंड संपला आहे.
भ्रष्टाचारमुक्त सरकार
चित्रा वाघ या व्हिडीओमध्ये पुढे म्हणतात की, आता आता महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे, शिंदे-फडणवीसांचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आलेले आहे. त्यामुळेच राज्यातले उद्योजक आता या भयमुक्त महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. नीलमताई चिंता तुमच्या पक्षाची करा. महाराष्ट्रातील व्यापार-उदीम अतिशय सुरक्षित हातात आहे, असा दावा करत त्यांनी नीलम वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना काय उत्तर देणार?
चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर आता शिवसेना काय उत्तर देणार, याची प्रतीक्षा आहे. एकीकडे शिवसेनेला शिंदे सेनेविरुद्ध दोन हात करावे लागत आहेत. दुसरीकडे भाजपच्या आरोपालाही प्रत्युत्तर द्यावे लागत आहे. सध्या शिवसेनेला ही दुहेरी लढाई लढावी लागत आहे. दसऱ्या मेळाव्यानंतर ही लढाई आणि आरोप-प्रत्यारोप अजून तीव्र होणार आहेत.