चार वर्षे घरफोडी, जमवली 11.70 लाखांची माया!: अट्टल घरफोड्या अटकेत, तब्बल 12 गुन्हे उघड, मित्राद्वारे करत होता सोने विक्री


नाशिक6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

चार वर्षापासून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह चोरीचे सोने विक्री करणाऱ्या दोघा मित्रांनी अटक करण्यात आली. संशयितांकडून चोरीचे 11 लाख 70 हजारांचे सोन्याचे दागिने दुचाकी जप्त करण्यात आली. संशयित दिवसा बंद फ्लॅटची रेकी करुन घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Advertisement

पथकाने संशयिताला पडघा येथे पाठलाग करुन अटक केली. शहानवाज उर्फ बरग्या अन्दर खान (वय – 40, रा. गुलशन नगर, वडाळागाव), मनोज उर्फ बाळा त्रंबक गांगुर्डे (वय – 30, रा. भुजबळ फार्मजवळ, जुने सिडको), पवन रविंद्र कुलकर्णी, (वय – 38, रा. हनुमान चौक, राणा प्रताप चौक) असे अटक केलेल्या संशयितांचे नावे आहेत. संशयितांकडून 12 गुन्हे उघडकीस आले.

याप्रकरणी उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, जे.एम.सी.टी. कॉलेजन समोर फातेमा टॉवर येथीलल फ्लॅट मध्ये दिवसा घरफोडीत 3 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते.. गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक तपास करत असतांना पथकाचे प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, मुख्तार शेख यांनी परिसरातील सीसी टिव्हीच्या अधारे एका दुचाकीचा माग काढला.

Advertisement

ही दुचाकी एका भंगार व्यावसायीकाची असल्याचे समजले. त्याच्याकडे तपास केला असता दुचाकी कामगार शहनवाज खान वापर करत असल्याचे समजले. संशयित हा कुटुंबिया समवेत अजमेर येथे गेला असल्याची माहिती मिळाली. तो राजस्थान गुजरात मार्ग मुंबईला येणार असल्याची माहिती मिळाली. संशयित रेल्वे स्टेशनवर उतरुन खासगी वाहनातून येत असल्याने पथकाने त्याचा पडघा पर्यंत पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संशयित गांगुर्डे आणि कुलकर्णी यांच्या मदतीने चोरी केलेले सोने विक्री केल्याची कबूली दिली. वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ, विष्णू उगले, असिफ तांबोळी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, यांच्या पथकाने सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

चोरीचे सोने जप्त

Advertisement

संशयितांकडून 111.79 ग्रॅम असा 11 लाख 70 हजारांचा सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताकडून घरफोडीचे 12 गुन्हे उघडकीस आले.

तर झाला असता फरार

Advertisement

संशयित हा सराईत गुन्हेगार असून तो 4 वर्षापासून पोलिसांना तुरी देत होता. तो अजमेर येथून उत्तर प्रदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या ळखीच्या एका इसमाला पोलिसांनी सोबत घेत त्याच्या सोबत संपर्क साधून त्याचा पाठलाग करत ताब्यात घेतले. थोडा उशिर झाला असता संशयित कुटुंबियासह पळून जाण्याची शक्यता होती.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement