मुंबई4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे. ‘चांद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यांनी वर्षा बंगल्यावर चांद्रयान-3 चा लॅंडिग सोहळा पाहिला. यावेळी राज्यातील मंत्री देखील उपस्थित होते. चांद्रयानचे यशस्वी लॅंडिंग होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व सर्वांनी भारत मातेचा जयजयकार केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून 14 जुलैला ‘चंद्रयान-3’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. ‘चांद्रयान 3’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते. भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे. या मोहिमेत इस्त्रोसोबतच देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता, ज्यांचा आम्ही नुकताच ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान् केला त्या रतन टाटाजी यांच्या टाटा स्टील कंपनीमध्ये बनविण्यात आलेल्या क्रेनचा वापर रॉकेट लॉन्चसाठी करण्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे.
पाहा- CM एकनाथ शिंदेंसह उपस्थितांनी केलेला जल्लोष
इस्रोचे असेच प्रयोग अवकाशात झेपावत राहोत- शदर पवार
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी ट्विट द्वारे शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
रशियाचे लुना पडले त्यापार्श्वभूमीवर मोठे यश
परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रयान ३ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे. भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे आजचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चंद्रयान ३ मोहीमेमधील विक्रम लॅन्डरच्या यशस्वी लॅंडिंगबद्दल समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
चांद्रयान उतरल्यानंतर आनंद – अंधेरी स्टेशनचा व्हिडिओ
सर्व शास्त्रज्ञ व भारतीयांचे अभिनंदन : आदित्य ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील अभिनंदन केले
चांद्रयान संदर्भातील अन्य बातम्या देखील वाचा
देवेंद्र फडणवीसांनी जपानमध्ये बघितले लँडिंग:म्हणाले- उगवत्या सूर्याच्या देशातून बनलो चांद्रयानच्या लँडिंगचा साक्षीदार
भारताच्या चांद्रयान-3 ने आज चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले. भारताच्या या यशाबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. जपान दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार राहिले. जपानमधील भारतीय दुतावासातून त्यांनी हा ऐतिहासिक क्षण बघितला. याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले- चांद्रयानसाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अपार कष्ट, महाराष्ट्राचेही त्यात योगदान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चांद्रयान 3 ची लॅंडिंग लॅपटॉपवर पाहिले. त्यांनी देखील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले,.
‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी
PHOTO : राज्यात विविध ठिकाणी उत्साह
‘चांद्रयान-3’ चंद्रावर अन् राज्यभरात जल्लोष:संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी वाजवले ढोल; शाळांमध्ये आनंदोत्सव, चौका-चौकात आतषबाजी
चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरले त्यामुळे देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. या राज्यभरात देखील आनंदोत्सव साजरा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील काही शाळांमध्ये मुलांना हा मोहीम पाहण्यासाठी विशेष सुविधा करण्यात आलेली होती. – येथे वाचा संपूर्ण बातमी
‘चंद्रस्पर्शा’वर श्रेयवादाचे राजकारण:चांद्रयान-3 हा नेहरूंच्या अभ्यासपूर्ण विचारांचे फळ- अशोक चव्हाण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज आपली चांद्रयान -3 मोहीम फत्ते केली. त्यानंतर आता या मोहिमेवरून राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका ट्विटद्वारे चांद्रयान -3 हा भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अभ्यासपूर्ण विचारांचा यशस्वी परिणाम असल्याचे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी आतापर्यंतच्या अंतराळ मोहीमेची यादीच वाचली. – येथे वाचा संपूर्ण बातमी
‘चांद्रयान-3′ यशस्वी, MGM विद्यापीठात आनंदोत्सव:’भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’चा जय घोष; विद्यार्थी, प्राध्यापकांचा जल्लोष
चांद्रयान-3 मोहीम जशी जशी चंद्राच्याजवळ पोहोचत होती तसं तसे टाळ्यांचा कडकडाटात त्याचे स्वागत केले जात होते. पंधरा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर जगातील पहिली मोहीम यशस्वी झाल्याबरोबर सर्वांनी उभे राहुन टाळ्यांचा कडकडाटाबरोबरच ‘भारत माता की जय’, वंदे मातरम’ चा जयघोष केला. एकमेकांची गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी, शास्त्रज्ञ, शिक्षक, प्राध्यापक आदींनी चांद्रयान मोहिमेच्या थेट प्रेक्षपणाचा आनंद लुटला. – येथे वाचा संपूर्ण बातमी