चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा: बुलडाण्याची शुद्ध चांदी, जळगावचे नोजल, सांगलीची रॉकेट कोटिंग अन् पुण्याचे बूस्टर्स

चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा: बुलडाण्याची शुद्ध चांदी, जळगावचे नोजल, सांगलीची रॉकेट कोटिंग अन् पुण्याचे बूस्टर्स


मुंबई9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भारताचे महत्त्वकांक्षी चांद्रयान बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रमातीवर उतरले. ही मोहीम फत्ते झाल्यामुळे भारताचा चंद्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या जगातील 4 निवडक देशांमध्ये समावेश झाला. विशेषतः भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक मोहिमेत महाराष्ट्राचेही मोलाचे योगदान आहे. चांद्रयान मोहिमेत बुलडाण्यातील खामगावची चांदी, पुण्यातील फ्लेक्स नोजल व बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

Advertisement

बुलडाण्याच्या खामगावची शुद्ध चांदी

चांद्रयान – 3 मोहिमेत बुलडाण्यातील खामगावचाही वाटा आहे. या मोहिमेत खामगावची चांदी व थर्मल फॅब्रिक्स वापरण्यात आले आहे. खामगाव देशाची रजतनगरी म्हणून ओळखली जाते. येथे शुद्ध चांदी मिळते. त्यामुळे चांद्रयान – 3 च्या स्टर्लिंग ट्यूबमध्ये ही चांदी वापरण्याची आली आहे, अशी माहिती खामगावचे प्रसिद्ध चांदी व्यापारी श्रद्धा रिफायनरीने दिली आहे.

Advertisement

चांद्रयानाचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिकचा पुरवठा खामगावच्याच भिकमची फॅब्रिक्सने इस्त्रोला केला आहे.

सांगलीत GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचे कोटिंग

Advertisement

सांगलीतील संदीप सोले यांच्या डॅझल डायनाकोट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचे महत्त्वपूर्ण कोटिंग केले आहे. या कंपनीत मागील 30 वर्षांपासून केवळ संरक्षण व अंतराळ संशोधनासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम केले जाते. GSLV यानाचा एक महत्त्वाचा भाग सांगलीजवळील माधवनगरमधील डॅझल डायनाकोट्स कारखान्यात तयार झाला आहे.

वालचंद इंडस्ट्रीजमध्ये तयार झाले बूस्टर

Advertisement

चांद्रयान -3 चे बूस्टर्सही महाराष्ट्रात तयार झालेत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील वालचंद इंडस्ट्रीजमध्ये चांद्रयानाला लागणाऱ्या बूस्टर्सची निर्मिती झाली आहे. बूस्टरसह यानाचे फ्लेक्स नोजलही येथेच तयार झालेत. वालचंद इंडस्ट्री व इस्रो मागील 50 वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत आहेत.

भारताने आजपर्यंत विविधांगी उपकरणे अंतराळात पाठवली आहेत. त्यातील हार्डवेअर बनवण्यात वालचंद इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. वालचंद इंडस्ट्रीने आतापर्यंत SLV 3, ASL ते PSLV, GSLV MKII, MKIII सह मंगळयान व चांद्रयानासारख्या प्रतिष्ठित मोहिमांसाठी योगदान दिले आहे.

Advertisement

वालचंद इंडस्ट्रीमध्ये चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि आता चांद्रयान -3 मोहिमेच्या LVM3 प्रक्षेपण यानात वापरण्यात आलेले बूस्टर सेगमेंट S200 हेड, एंड सेगमेंट, मिडल सेगमेंट व 3.2 मीटर व्यासाचे नोजल एंड सेगमेंट तयार करण्यात आले आहे.

जुन्नरच्या 2 सुपुत्रांची महत्त्वपूर्ण कामगिरी

Advertisement

जुन्नरच्या 2 सुपुत्रांची चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. असिफभाई महालदार हे उद्योजक आहेत. त्यांची रिलायन्स फायर सिस्टीम नामक कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला या मोहिमेसाठी 6 कोटींचे कंत्राट मिळाले. ते जुन्नरच्या राजुरीत राहतात.

चांद्रयान मोहिमेत काही धोका उद्भवला तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीस्तव मोठी यंत्रणा सूसज्ज ठेवावी लागते. ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीमने इस्त्रोला पुरवली होती. ही यंत्रणा प्रक्षेपण स्थळी म्हणजे श्रीहरिकोटा येथे लावण्यात आली होती.

Advertisement

राजुरी गावातील मयुरेश शेटे इस्त्रोत शास्त्रज्ञ आहेत. त्यांचाही चांद्रयान मोहिमेत सहभाग आहे. ते सीनिअर सायंटिस्ट इस्त्रोत कार्यरत आहेत. त्यांचे वडील राजुरीत प्राचार्य आहेत. मयुरेश यांचे प्राथमिक शिक्षण राजुरीतील शिक्षण विद्या विकास मंदिर येथे झाले आहे.Source link

Advertisement