चांदूर बाजार समितीत ‘प्रहार’चे राजेंद्र-गजेंद्र‎: आमदार बच्चू कडू यांची यशस्वी खेळी; दोन्ही जागा बिनविरोध, विजयानंतर केला जल्लोष


चांदूर बाजार‎39 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार‎ समितीच्या सभापतिपदी राजेंद्र याऊल‎ यांची, तर उपसभापती गजेंद्र गायकी यांची ‎ ‎ बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रिया ‎ ‎ बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. ‎ ‎ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. ‎ मदारे यांनी ही काम पाहिले.‎

Advertisement

बाजार समितीच्या सभापती व उपसभापती ‎ ‎ पदासाठी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पार‎ पडली. माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या ‎ ‎ प्रहार जनशक्ती पार्टीने निवडणुकीत एकहाती ‎ ‎ सत्ता काबीज केल्यानंतर सभापती आणि ‎ ‎ उपसभापती ही त्याच पक्षाचा होणार, हे स्पष्ट ‎ ‎ होते. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या ‎ ‎ संमतीनेच सभापती, उपसभापती पदाचे‎ उमेदवार ठरविण्यात आले. यावेळी मोठ्या ‎ ‎ संख्येने प्रहारचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रात काम‎ करणारी नेते मंडळी उपस्थित होती.‎ पहिल्यांदा बारी समाजाला नेतृत्व : कृषी उत्पन्न‎ बाजार समितीच्या सभापती पदाकरिता जातपातीचा‎ विचार न करता यावेळी प्रहारने बारी समाजाला‎ प्रतिनिधित्व दिले. त्यानुसार सभापतिपदी राजेंद्र‎ याऊल यांची निवड केली गेली. तर उपसभापतीपदी‎ गजेंद्र गायकी यांची निवड करुन प्रहारने सामान्य‎ कार्यकर्त्याचा सन्मान केला. अशाप्रकारे आमदार‎ कडू यांनी गायकी यांना त्यांच्या कार्याची पावती‎ दिली, अशा प्रतिक्रिया प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त‎ केल्या.

शेतकऱ्यांना कुठला ही त्रास होणार नाही‎ यासाठी योग्य धोरण ठरवून काम करा. शेतकरी हा‎ बाजार समितीमधून हताश जाऊ नये, याकडे‎ सभापती आणि उपसभापती तसेच संचालक यांनी‎ लक्ष ठेवून काम करावे. प्रहार पक्ष हा कधीच‎ जाती-पाती, धर्माचा विचार करून राजकारण करत‎ नाही. सभापती, उपसभापती, संचालक यांना‎ शुभेच्छा आणि जे या निवडणुकीसाठी झटले त्या‎ सामान्य कार्यकर्ते, नेते त्यांना देखील धन्यवाद, असे‎ अामदार बच्चू कडू म्हणाले.‎

Advertisement

शेतकरी हिताला प्राधान्य‎ एक सामान्य कार्यकर्ता ते सभापती हा प्रवास खूप मोठा आहे. पण माजी राज्यमंत्री तथा‎ आमदार बच्चूभाऊ कडू यांनी माझ्यासाठी तो लहान केला, याबद्दल त्यांचे खूप आभार.‎ माझे इतर संचालक सहकारी यांनीदेखील माझ्यासाठी खूप कष्ट उपसले, त्यांचे देखील‎ आभार. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच शेतकरी हितासाठी‎ नवनवीन धोरण राबवले जाईल, ही ग्वाही देतो.‎

– राजेंद्र याऊल, सभापती‎ ‎

AdvertisementSource link

Advertisement