चर्चा: भाजप प्रवेशाची 2 वर्षांपूर्वीच होती ऑफर, तडजोड केली असती, तर ‘मविआ’चे सरकार तेव्हाच पडले असते – अनिल देशमुख


नागपूर4 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मला भाजप प्रवेशाची 2 वर्षांपूर्वीच ऑफर मिळाली होती. त्यावेळी जर मी तडजोड केली असती तर महाविकास आघाडीचे सरकार पडले असते, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Advertisement

जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचे बोलावणे आल्याचा आरोप ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.

जयंत पाटलांवर दबाव

Advertisement

अनिल देशमुख यांनी जयंत पाटलांवर झालेल्या ईडी चौकशीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख म्हणाले, जयंत पाटील यांच्यावर दबाव होता, असे आजच्या सामनात म्हटले आहे. जयंत पाटील यांनी देखील याबाबत भाजपवर आरोप केला आहे. केंद्रिय यंत्रणा महाराष्ट्रात कशाप्रकारे काम सुरु आहे सगळ्यांना माहित आहे.

विरोधात कोणी बोलले की….

Advertisement

अनिल देशमुख म्हणाले, अनेकांच्या बाबतीत असे प्रकार झाले. आमच्या विरोधात कोणी बोलले कोणी विरोधी भूमिका घेतली तर त्यांच्यामागे चौकश्या लावायच्या. भाजपचा दबाव जयंत पाटलांवर होता.

त्यामुळे मला भोगावे लागले

Advertisement

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, 2 वर्षांपूर्वीच माझ्याकडे प्रस्ताव आला होता, मी तडजोड केली असती तर 2 वर्षापूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार पडले असते. मात्र मी समझोता करण्यास मी नकार दिला. त्यामुळे मला सगळे भोगावे लागले, असाही आरोप यावेळी अनिल देशमुख यांनी केला.

माझ्याकडे सर्व पुरावे

Advertisement

संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव टाकला, याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. यााबतचे व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे अनिल देशमुखांनी स्वत: शरद पवारांनाही दाखवले होते. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांच्यावरही भाजप प्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी तो नाकारताच त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यावर अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे.

संंबधित वृत्त

Advertisement

आरोप:अनिल देशमुख, जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव होता; माझ्याकडे सर्व पुरावे- संजय राऊत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव होता. त्यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानंतरच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर

Advertisement



Source link

Advertisement