चक्रीवादळ ‘गुलाब’ आज धडकणार: ​​​​​​​ओडिशामधून 1600 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले, आंध्रात बचाव कार्य सुरू, पाकिस्तानने या वादळाला दिले नाव



  • Marathi News
  • National
  • Cyclone Rose To Make Landfall On Coast Of Odisha And Andhra Pradesh; News And Live Updates

Advertisement

नवी दिल्ली3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • 6 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आज संध्याकाळी गुलाब चक्रीवादळ धडकणार आहे. हवामान विभागाने आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात आणि ओडिशाच्या दक्षिण भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. बचावकार्यासाठी ओडिशा राज्यात एनडीआरएफचे 24 पथक आणि ओडिशा आपत्ती जलद कृती दलाच्या 42 पथक तैनात करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून आतापर्यंत 1 हजार 600 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Advertisement

गोपाळपूर किनारपट्टीवर चक्रीवादळाचे रौद्र रुप
गुलाब चक्रीवादळाने ओडिशाकडे प्रस्थान करायला सुरुवात केली आहे. आज दुपारी अडीच वाजता गोपाळपूर किनारपट्टीवर वातावरणाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. गुलाब चक्रीवादळ समुद्रात 140 किलोमीटरवर आतच असून गोपाळपूर किनारपट्टीच्या भूभागावर आदळण्यास अजून 12 तास लागणार आहे. म्हणजेच आज रात्री 12 नंतर हे चक्रीवादळ गोपाळपूर किनारपट्टीवर धडकणार आहे.

6 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
गुलाब चक्रीवादळ हे रविवारी संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश (विशाखापट्टणम) आणि दक्षिण ओडिशा (गोपाळपूर) दरम्यान कलिंगपट्टणम जवळील किनाऱ्याला धडकणार आहे. या दरम्यान वाऱ्यांचा वेग 75 किमी ते 85 किमी प्रतितास असेल. वादळ तीव्र झाल्यावर वारे 95 किमी प्रतितासापर्यंत पोहोचू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. हे वादळ पश्चिम दिशेने दक्षिण छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात पर्यंत जाईल. या दरम्यान, रविवार ते मंगळवार सकाळपर्यंत या 6 राज्यांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

पाकिस्तानने या वादळाला दिले नाव
हवामान खात्याच्या मते, पाकिस्तानने या वादळाला गुलाब हे नाव दिले आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्था/एशिया-पॅसिफिकसाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग आणि सायक्लोनिक स्टॉर्मसवर तयार केलेल्या पॅनलने तयार केलेल्या यादीतून हे नाव काढण्यात आले आहे. या पॅनेलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका यासह 13 देश या प्रदेशात येणाऱ्या वादळांची नावे निवडतात.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement