- Marathi News
- Local
- Maharashtra
- Mumbai
- Ashok Chavan On Chandrayaan 3 Mission ISRO Was Established During Pandit Nehru Time, Chandrayaan 3, The Fruit Of Nehru’s Insightful Thoughts, List Of Space Missions Counted By Ashok Chavan
मुंबई31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज आपली चांद्रयान -3 मोहीम फत्ते केली. त्यानंतर आता या मोहिमेवरून राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका ट्विटद्वारे चांद्रयान -3 हा भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अभ्यासपूर्ण विचारांचा यशस्वी परिणाम असल्याचे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी आतापर्यंतच्या अंतराळ मोहीमेची यादीच वाचली.
अशोक चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोचे हार्दिक अभिनंदन. भारतातील लोकांसाठी हा अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण आहे. महान शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाची सुरुवात करणारे आमचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अभ्यासपूर्ण विचारांचा हा आणखी एक यशस्वी परिणाम आहे.
पाहा काय म्हणाले अशोक चव्हाण, VIDEO