चंद्रपूरच्या खेडी गावातील शेताशिवारातील वाघांचा वावर: चार वाघ असल्याच्या चर्चेने गावकरी दहशतीत

चंद्रपूरच्या खेडी गावातील शेताशिवारातील वाघांचा वावर: चार वाघ असल्याच्या चर्चेने गावकरी दहशतीत


नागपूर10 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी गावातील शेताशिवारातील झुडपी जंगलात एक वाघ, वाघीण आणि दोन शावकांसह 4 वाघ फिरत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र, याबाबतीत सावली वनविभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

Advertisement

खेडी गावाला लागून असलेल्या शिवमंदिराजवळ अलिकडे दोन तीन वेळा चार वाघ दिसल्याने नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वाघांनी रानडुकराची शिकार केल्याचे दिसून आले. सदरची माहिती तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक कोडापे, वनरक्षक आखाडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर हेसुद्धा पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

जंगली श्वापदाच्या अस्तित्वामुळे शेतीची कामे प्रभावित झाली असल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आंदोलन केले. वन्यप्राण्यांचे दर्शन आणि मानवावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार सावली तालुक्यात घडत आहेत. वाघ, बिबट्या, रानडुक्कर, लांडगे असे वन्य प्राणी सावली तालुक्यातील जंगलात सहज दिसतात.

Advertisement

तालुक्यातील 90 टक्के कृषी क्षेत्र जंगलाने वेढलेले आहे. वाघांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने या भागात चार कॅमेरे बसवले आहेत. मात्र वन्य प्राण्यांच्या दहशतीपासून पूर्णपणे मुक्ती मिळावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. शेतीच्या कामांवर परिणाम होत असून शेतमजूर काम करण्यास नकार देत आहेत. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींच्या नुकसानभरपाईची रक्कम सरकारने वाढवली. पण आमच्यावरील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची संख्या कमी करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही”, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



Source link

Advertisement