चंद्रकांत पाटील भाषणाला उभे राहताच तरुणाचा गोंधळ!: पोलिसांनी घेतले त्यास ताब्यात, खिशात सापडली किटकनाशकाची बाटली

चंद्रकांत पाटील भाषणाला उभे राहताच तरुणाचा गोंधळ!: पोलिसांनी घेतले त्यास ताब्यात, खिशात सापडली किटकनाशकाची बाटली


पुणे9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुण्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचा आज खेड येथे कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमात एका तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. शेतीसंदर्भातील प्रश्न विचारून मागणी करून चंद्रकांत पाटील यांच्या भाषणात अडथळा निर्माण केला. त्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली. अखेर भाजप कार्यकर्त्यांनी या तरुणाला समज दिली. तर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत विचारपुस केल्यानंतर त्यांच्या खिशात किटकनाशकाची बाटली सापडल्याने घटनास्थळी चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

Advertisement

काही दिवसांपूर्वीच पाटलांवर शाईफेक
चंद्रकांत पाटील यांच्यावर काही महिन्यांपूर्वी शाईफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. संबंधित प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणाची आठवण देणारं प्रकरण आज घडलं आहे. एका तरुणाने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाच्यावेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांकडून अशी लोक पाठविली जातात
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरु झाल्यानंतर संबंधित प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सांगत असताना विरोधकांकडून सभेत गोंधळ घालण्यासाठी अशी लोकं पाठवली जातात, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

Advertisement

तरुणाने का घातला असेल गोंधळ?
चंद्रकांत पाटील यांच्या सभेनंतर पोलिसांकडून शेतकरी तरुणाची विचारपूस करत असताना त्याच्या खिशात कीटकनाशक औषध बाटली आढळून आली. भामा-आसखेड धरणातील पाणी भामा नदी पात्रात सोडण्याची तरुण शेतकऱ्याची मागणी होती. कृष्णा मारुती टोपे असं या तरुण शेतकऱ्यांचं नाव आहे. तरुणाच्या खिशात कीटकनाशकाची बाटली सापडल्याने त्याच्या मनात नेमकं काय होतं? असा प्रश्न निर्माण झालाय. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.Source link

Advertisement