घेरले: संजय राऊतांविरोधात 2 वेगवेगळे हक्कभंग, ज्यांच्यावर आरोप केले ते भाजप आमदार राहुल कुलच चौकशी समितीचे अध्यक्ष


मुंबई2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात दोन वेगवेगळे हक्कभंग दाखल झाले आहेत. यापैकी एका प्रकरणाचा निर्णय राज्यसभेची हक्कभंग समिती घेणार आहे. तर, दुसऱ्या हक्कभंगाबाबतचा फैसला विधानसभेची समिती घेणार आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांनी ज्यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, ते भाजप आमदार राहुल कुल हेच विधानसभेच्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत.

Advertisement

राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखालीच संजय राऊत यांची आता चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे संजय राऊतांवर हक्कभंग समिती कारवाई करणार का? केल्यास कोणती कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिला हक्कभंग कोणता?

Advertisement

संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटले, असा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी राऊतांविरोधात पहिला हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला. संजय राऊत यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीसमोर संजय राऊत यांनी आपला लेखी खुलासाही सादर केला आहे. त्यात आपण संपूर्ण विधिमंडळाला नव्हे तर केवळ शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांनाच चोर म्हटलो होतो, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

कारवाईबाबत राज्यसभा घेणार निर्णय

Advertisement

दरम्यान, संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांच्यावर निलंबनाची किंवा अशाच प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार हा राज्यसभेला आहे. त्यामुळे विधानसभेने संजय राऊतांविरोधातील हा हक्कभंग प्रस्ताव आता राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवला आहे. राज्यसभेची हक्कभंग समिती याची अधिक चौकशी करून पुढील निर्णय घेणार आहे.

दुसरा हक्कभंग प्रस्ताव

Advertisement

संजय राऊतांविरोधात दुसरा हक्कभंग प्रस्तावदेखील शिंदेंच्याच शिवसेनेने दाखल केला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांविरोधात दुसरा हक्कभंग विधानसभेत दाखल केला आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत म्हणाले होते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा त्यांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही. तसेच, राहुल नार्वेकर यांना पक्षांतराचा छंद आहे. त्यामुळेच बेकायदेशीरपणे पक्षांतर करणाऱ्यांना ते पाठीशी घालत आहेत, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आमदार संजय शिरसाट यांनी दुसरा हक्कभंग दाखल केला आहे.

संजय शिरसाटांचे पत्र

Advertisement

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या पत्रात संजय शिरसाट यांनी म्हटले होते की, विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करत नाहीत. ते सर्वच पक्षांचे विधिमंडळातील पीठासन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटो, बेफाम आरोप करून जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम संजय राऊत करत आहेत.

दुसऱ्या हक्कभंगाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार

Advertisement

विशेष म्हणजे विधानसभेच्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष हे भाजप आमदार राहुल कुल आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली संजय राऊतांची चौकशी होणार आहे. याबाबत आज माध्यमांना माहिती देताना आमदार राहुल कुल यांनी सांगितले की, संजय राऊतांच्या एका हक्कभंग प्रकरणाचा निर्णय राज्यसभा घेईल तर दुसऱ्या हक्कभंगाबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. दुसऱ्या हक्कभंगाबाबतचा प्रस्ताव अद्याप विधानसभेच्या समितीकडे आलेला नाही. तर, पहिल्या हक्कभंगाबाबतचा प्रस्ताव विधानसभेने राज्यसभेकडे पाठवला आहे. दुसरा प्रस्ताव आल्यावर त्यावर कार्यवाही सुरू करू.

संजय राऊतांचे राहुल कुल यांच्यावर आरोप

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार राहुल कुल यांना संजय राऊतांनी लक्ष्य केले आहे. दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. या कारखान्याचे मालक भाजप आमदार राहुल कुल आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे लॉन्ड्रिंग झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे आता सीबीआयकडे दिले असून सीबीआय या प्रकरणात काय कारवाई करते, हे पाहू. विरोधी पक्षातील लोकांना अगदी 2 ते 5 लाख रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. मात्र, राहुल कुल यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे.

याच राहुल कुल यांच्याकडे संजय राऊतांच्या हक्कभंग प्रस्तावाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

संजय राऊतांना काय शिक्षा होऊ शकते?

विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभा या सभागृहांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार या सभागृहांना आहे. त्यासाठी संबंधित सभागृह त्या व्यक्तीविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. सभागृहाचा अपमान करणारी व्यक्ती त्याच सभागृहाचा सदस्य असेल, तर अशा व्यक्तीवर निलंबनाची कारवाई करता येऊ शकते. येथे संजय राऊतांच्या प्रकरणात विधानसभेत हक्कभंग आणला गेला आहे. मात्र, राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे विधानसभा राऊतांवर निलंबनाची कारवाई करू शकत नाही. राज्यसभा करू शकते. विधानसभा संजय राऊतांना कठोरातील कठोर शिक्षा म्हणून तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकते. याशिवाय समज देणे, ताकीद देणे, दंड आकारणे, अशा शिक्षा होऊ शकतात.

Advertisement

संबंधित वृत्त

राजकारण:संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर; शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांचे गंभीर आरोप

Advertisement

दिव्य मराठी विश्लेषण:हक्कभंग वादावर संजय राऊतांकडे दोनच पर्याय; दिलगिरी किंवा कोर्टात आव्हान

त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्यांनी गोमूत्र शिंपडले तेच दंगलखोर- संजय राऊत, सरकारने त्यांचीच चौकशी करण्याची मागणी

Advertisement



Source link

Advertisement