घाटीतील घाण पाहून चाकणकरांचा थेट वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनाच फोन: प्रसूती आणि बालरोग विभागाच्या पाहणीनंतर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना

घाटीतील घाण पाहून चाकणकरांचा थेट वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनाच फोन: प्रसूती आणि बालरोग विभागाच्या पाहणीनंतर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना


छत्रपती संभाजीनगर35 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

रूपाली चाकणकर यांनी प्रसूती विभागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला.

  • घाटीत रुग्ण बरे हाेण्यासाठी येतात की अाजार घेऊन घरी जाण्यासाठीॽ
  • जिल्हाधिकारी पांडेय म्हणाले, वरिष्ठांना पाठवून अाढावा घेणार

घाटी रुग्णालयात जागाेजागी कचऱ्याचे ढीग अाहेत. भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी लाल झाल्या अाहेत. रुग्णांचे नातेवाईक नाइलाजाने घाणीजवळ फरशीवर झोपतात. एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू तर काही वाॅर्डांत पाण्याची व्यवस्थाच नाही. घाटीची अशी भयावह स्थिती पाहून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी दुपारी थेट राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन लावून तक्रार केली. नंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना फाेन करून घाटीत रुग्ण बरे हाेण्यासाठी येतात की अाजार घेऊन घरी जाण्यासाठी येतात, असा सवाल केला. त्यावर पांडेय यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून अाढावा घेण्यास सांगताे, असे उत्तर देत सारवासारव केली.

Advertisement

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर जालन्यातील जखमी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी मंगळवारी घाटीत अाल्या हाेत्या. त्यांनी प्रसूती आणि बालरोग विभागाला भेट देऊन पाहणी केली. सर्जरी इमारतीमध्ये गेल्यानंतर सर्वत्र तंबाखू खाऊन थुंकल्याचे दिसेल. कचऱ्याचे ढीग साचले हाेते. उरलेले अन्नही फेकून दिलेले िदसले. त्यामुळे इतकी अस्वच्छता कशी आहे, असा सवाल त्यांनी डाॅक्टरांना केला. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांना फोन करून घाटीतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली.

Advertisement

एकाच बेडवर दोन जणांवर होताहेत उपचार

  • बालरोग विभागात एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे दिसले. प्रसूती विभागात महिलांची गर्दी, अस्वच्छता हाेती.
  • चाकणकर यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाेबत संवाद साधत चांगली सेवा मिळते का, असे विचारले. तेव्हा सेवा चांगली अाहे, पण प्रचंड घाण असल्याची तक्रार रुग्णांनी केली.
  • प्रसूती विभागात ९० बेड असताना दाेनशेपेक्षा अधिक महिला दाखल हाेतात. त्यामुळे नेहमीच गर्दी असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांनी सांगितले.
  • चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ७०० पदे मंजूर अाहेत. सध्या यातील ३२० पदे रिक्त अाहेत.
  • रुग्णांची संख्या वाढत असताना कर्मचारी कमी असल्याने सर्वत्र अस्वच्छता अाढळून येत अाहे.

रुग्णांची संख्या अधिक, प्रशासनावर कामाचा ताण
घाटीतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे कामाचा ताण वाढला अाहे. अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे अडचणी येतात. तरीही आम्ही घाटीत स्वच्छता ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो.

Advertisement

– डॉ. विजय कल्याणकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

नातेवाइकांनी स्वच्छता ठेवावी

Advertisement

चाकणकर म्हणाल्या, घाटीत येणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांनीही स्वच्छता बाळगली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकणे, घाण करणे चुकीचे आहे. अनेक ठिकाणी जेवणाचे खरकटे टाकलेले आहे. कर्मचारी स्वच्छता करत असले तरी अालेले नागरिक घाण करतात. हे चुकीचे अाहे. रुग्णालयाचा परिसर अापणच स्वच्छ ठेवला पाहिजे.Source link

Advertisement