घरी सोडून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार: नागपूरातील घटनेने खळबळ, आरोपींना अटक


नागपूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेतील दोन्ही आरोपींना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

Advertisement

शाळा सुटल्यावर पीडित मुलगी घरी जाण्यासाठी पायी निघाली असताना ओळखीतील दोन तरुणांनी तिला कारने घरी सोडून देण्याची बतावणी केली. आरोपी पीडित विद्यार्थीनीचे ओळखीचे असल्यामुळे अल्पवयीन मुलगी त्यांच्या कारमध्ये बसली. आरोपीनी घरी सोडून देण्याऐवजी थेट खापा मार्गावरील कोदेगावकडील निर्मनुष्य स्थळी नेऊन तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

मैत्रिणीने करुन दिली ओळख

Advertisement

अखिल उर्फ अक्की महादेव भोंगे आणि पवन विठ्ठल भासकवरे अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पीडित विद्यार्थीनी ही पाटणसावंगीच्या शाळेत शिकते. दोन महिन्यांपूर्वी तिच्या मैत्रिणीने आरोपींसोबत ओळख करून दिली होती. येता जाता भेट होत असल्याने पीडितेची आरोपींसोबत मैत्री झाली होती.

अशी घडली घटना

Advertisement

काल संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पीडित तरुणी पायी चालत घरी जात असताना आरोपी अखिल महादेव भोंगे आणि पवन भासकवरे हे दोघेही कार घेऊन आले. आम्ही तुझ्या घराच्या दिशेनेच जात असल्याची बतावणी करून दोघांनी तिला कारमध्ये बसवले. अल्पवयीन विद्यार्थीनी कारमध्ये बसल्यानंतर आरोपींनी कार मुलीच्या घराच्या दिशेने नेण्याऐवजी थेट खापा मार्गावरील कोदेगावा कडील निर्मनुष्य स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक

Advertisement

पीडित अल्पवयीन मुलीला सोडून आरोपींनी पळ काढला. पीडितेने कसे बसे घर गाठले. घर गाठताच तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला धीर देत सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तत्काळ गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध भादंवि 363, 376 (2) (j), 376 (5), 323, 506, 34 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 कलम 4, 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement