मुंबई9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कोणता सरकारी कर्मचारी हे पगारावर अवलंबून आहे. त्यांचा पैसा घरात ठेवायला जागा नाही. 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
गायकवाड यांच्या या वक्तव्यावर राज्य कर्मचारी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. सध्या जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. त्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
संजय गायकवाड म्हणाले की, सरकारी कर्मचारी हे बाहेरचे पैसे कमावून ते गंडगंज झाले आहेत, त्यांना पेन्शनची काय गरज. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारी कर्मचारी हे 8 तास काम करतात, तर आमदार हे 24 तास उपलब्ध असतात, आमदार होण्यासाठी 30 वर्षे गमावले, आमचा पगार असेल 1 लाख 82 हजार. मात्र, आमचा खर्च हा महिना 5 लाखांचा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
कर्मचारी माजले आहेत
संजय गायकवाड म्हणाले की, आमदारांचा लाखभर रुपयांचा तर डिझेलचा खर्च होतो. हे सरकारी कर्मचारी माजले आहेत. शेतकरी काम घेऊन जात असले तरी 6 सहा महिने कुणाचे काम होत नाही. शेतकरी विषाच्या बाटल्या घेऊन त्यांच्याकडे जातो, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर केला आहे.
संपत्ती मावत नाही
संजय गायकवाड म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार आहे. कोणता कर्मचारी सरकारी पगारावर अवलंबून आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 95 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरची हरामाची कमाई आहे, त्यांची संपत्ती घरात मावत नाही, इतके ते गडगंज झाले आहेत अशी वादग्रस्त वक्तव्य गायकवाड यांनी केले आहे.