घरचा आहेर: भाजप कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनाचा इशारा; सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डच्या मोबदल्यासाठी आक्रमक


सोलापूर17 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सोलापूरमधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घरचा आहे दिला. सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेचा वाढीव मोबदला द्या. अन्यथा थेट सरकारविरोधात उपोषण सुरू करू, असा इशारा आक्रमक कार्यकर्त्यांनी दिला.

Advertisement

देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी वाढीव मोबदल्यासाठी भाजप नेते आक्रमक झाले. त्यांनी फडणवीसांना तसे निवेदनही दिले. तसेच आपल्या मागणीला प्रशासन कशा वाटाण्याच्या अक्षता लावत आहे, हे पोटतिडकीने मांडले.

उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सोलापूरमध्ये नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना एक निवेदन देऊन सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेच्या भूसंपादनात वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी केली. अक्कलकोट तालुक्यातही हा ग्रीनफिल्ड जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र, त्यांच्या हातावर अत्यंत तोकडा मोबदला टेकवला. याविरोधात गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली.

आझाद मैदानावर उपोषण

Advertisement

शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही, तर शिंदे-फडणीस सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशारा अक्कलकोट येथील भाजप नेते आणि पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी दिला. अक्कलकोट येथील भाजप कार्यकर्ते आझाद मैदानावर उपोषणाला बसतील, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

एकाला घेतले ताब्यात

Advertisement

शेतकरी सध्या संकटात आहे. उसाला योग्य भाव मिळत नाही. यासाठी रयत क्रांती संघटनेने आंदोलन केले. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

इतर बातम्याः

Advertisement

हे उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे, ठाकरेंच्या अग्रलेखाला भाजपचे उत्तर; सावरकर, महाराष्ट्रद्रोही म्हणून उल्लेख

…तर लोकशाही काय चाटायची आहे का?; नव्या संसदेच्या उद्घाटनावरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

Advertisement

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, राज्यातील काँग्रेस नेत्यांचे हायकमांडला साकडे



Source link

Advertisement