घपला..!: पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टची 50 लाखांची फसवणूक प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल


पुणे7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे शैक्षणिक शुल्क संस्थेत जमा न करता त्याचा परस्पर अपहार केल्या प्रकरणी आठ आरोपी विरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

Advertisement

तरन्नूम कादर सय्यद (वय ४३),तबस्सुम अन्वर शेख (वय ४८),अन्वर नजीमुल्ला शेख (वय ५५, दोघे रा. लष्कर), काद छोटेमियाँ सय्यद (वय ५२, रा. लोणावळा), ताजेमा खान (वय ४२), अमिन आरीफ शेख (वय ३७), आरिफ शेख (वय ४०) सोहेल इस्माइल खान (वय ४८, रा. अमार सोसायटी, कोंढवा)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

याबाबत जुबेर रशीद खान (वय ४४, रा. मेलोनी पार्क सोसायटी, नाना पेठ,पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तक्रारदार जुबेर खान पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. पुण्यातील कोंढव्यातील मीठानगर भागात संबंधित शैक्षणिक संस्था आहे.

Advertisement

महारष्ट्र एजुकेशन शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या कागदपत्रांवर आरोपींनी बनावट स्वाक्षरी केली. खान तसेच त्यांच्या आईची बनावट स्वाक्षरी करुन जवाद शेख या शिक्षकाची अनुदानित पदावर बेकायदेशीर नियुक्ती केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली एक महिला कर्मचारी आजारी होती. तिने संस्थेच्या कागदपत्रांवर सही केल्याचे खान यांनी तक्रारीत सांगितले आहे.

आरोपींनी विद्यार्थ्यांकडून जमा केलेले ५० लाखांचे शुल्क संस्थेत जमा केले नाही. त्यामुळे संस्थेची फसवणूक, तसेच पैसे अपहार केल्या प्रकरणी खान यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी आठ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस मोहिते पुढील तपास करत आहेत.

Advertisement



Source link

Advertisement