ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन: देवेंद्र फडणवीस म्हणाले – पाणी पुरवठ्याच्या कामासाठी त्वरीत जमीन उपलब्ध करून देऊ


पुणे44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरीत भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिली.

Advertisement

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे असा नवा विचार अलिकडच्या काळात समोर आला आहे. नव्या १०० द.ल.लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शहराला चांगला पाणी पुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्राने ३०० द.ल.लिटरची क्षमता गाठल्यावर शहराची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्वाचा आहे. जलवाहिन्यांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी अडचण दूर करून आवश्यक जमीन एका महिन्याच्या आत महापालिकेला देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली.

Advertisement

सांडपाण्यावर प्रक्रीया करा

पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रासाठी अशा पाण्याचा उपयोग करता येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सेाबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल. शाश्वत शहरांकडे जाण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल. प्रत्येक शहराला वर्षानुवर्षे साठवलेले कचऱ्याच्या डोंगरांवर प्रक्रीया करणेदेखील आवश्यक आहे. या गोष्टी वेगाने केल्यास पिंपरी चिंचवड आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल.

Advertisement

नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली

गदिमांच्या नावाने अतिशय सुंदर सभागृह तयार केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करून फडणवीस म्हणाले, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले ग.दि. माडगुळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला. साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे. हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम आपण केले आहे.ग.दि.माडगूळकर सभागृह ६७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे.

Advertisement



Source link

Advertisement