ग्वाही‎: पिकांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले‎


छत्रपती संभाजीनगर‎काही सेकंदांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी‎ पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठया‎ प्रमाणात नुकसान झाले आहे. विरोधी‎ पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना व‎ संभाजीनगर जिल्ह्यात आज केलेल्या पीक‎ नुकसानीच्या पाहणीत अनेक ठिकाणी‎ पंचनामेच झाले नसल्याचे समोर आले‎ आहे. अवकाळी पावसाने नुकसान‎ झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे‎ निर्देश दिलेले असतानाही अद्याप पंचनामेच‎ झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी दानवे यांना‎ सांगितले. गेल्या आठवड्यात‎ छत्रपती संभाजीनगर व जालना‎ जिल्ह्यात पाऊस झाला.

Advertisement

दानवे‎ यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर‎ तालुक्यातील ढोपटेश्वर शिवार येथील‎ शेतकरी नाथाराम शेळके यांच्या शेतातील‎ डाळिंब फळांचे नुकसानाची‎ अधिकाऱ्यांसह पाहणी केली, तसेच‎ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देमनी‎ वाहेगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी‎ साईनाथ तांगडे यांच्या शेतातील बांधावर‎ जाऊन गहू, हरभरा पिकाच्या नुकसानीची‎ पाहणी केली.‎ पिके हाताला आलेली असताना‎ अवकाळी पावसामुळे डाळींब, मोसंबीच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ फळबागा व हरभरा, गहू आदी पिके आडवी‎ झाली आहेत. आता दुसरे पीक‎ घेण्यासारखीही स्थिती नाही. त्यामुळे‎ शेतकऱ्यांना ३३ टक्के नुकसानीचे निकष न‎ लावता सरसकट मदत द्यावी, अशा सूचना‎ दानवे यांनी संबंधित तहसीलदार व कृषी‎ अधिकारी यांना दिल्या.‎

एकीकडे शेतकरी सुलतानी संकटाचा‎ सामना करत असताना शेतकऱ्यांवर‎ अस्मानी संकटाने घाला घातला आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा‎ देण्याचे काम करावे. सततच्या पावसाची‎ मदत अद्याप मराठवाड्यातील बहुसंख्य‎ शेतकऱ्यांना मिळाली नाही. याबाबत‎ शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभागृहात‎ आवाज उठवणार असल्याची ग्वाही‎ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.‎ यावेळी तहसीलदार सुमन मोरे व शिवसेना‎ पदाधिकारी माजी आमदार संतोष सांबरे,‎ भास्कर आंबेकर आदी उपस्थित होते.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement