ग्राउंड रिपोर्ट: व्यापाऱ्यांकडून कारागिरांना भोजन, निवासाचीही व्यवस्था! झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांचा कारागिरांना मदतीचा हात


Advertisement

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या कारागिरांसाठी सार्थक असा पुढाकार घेतला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान कारागिरांना स्थलांतर करावे लागले होते. त्यावरून धडा घेत २०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांनी कारागिरांना मदतीचा हात दिला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमारपाल जैन म्हणाले, कारागिरांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये व त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आम्ही त्यांना भोजन तसेच निवासाची व्यवस्था करून देत आहोत. काही व्यापाऱ्यांनी आपले कारागीर तसेच कर्मचाऱ्यांसाठी भाड्याने घरांची व्यवस्थादेखील करून दिली आहे. झवेरी बाजारात गेल्या १० वर्षांपासून काम करणारे २९ वर्षीय तारक सामंता म्हणाले, गेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच गोष्टींचे खूप हाल सोसावे लागले. आम्ही दिवसभरात कसेबसे हजार रुपये कमावतो. लॉकडाऊनध्ये गावाकडे शेतीकाम करावे लागले होते. तेथे केवळ २००-२५० रुपये मिळत होते. त्यात घरखर्चदेखील भागवणे कठीण झाले होते.

Advertisement

या वेळी मुंबईत लॉकडाऊन लागू झाल्यास आमची या पुढाकारामुळे व्यवस्था होणार आहे. याचा दिलासा वाटतो. गेल्या लॉकडाऊनमधील खूप कामही पडलेले आहे. ते पूर्ण करावे लागेल. खूप काम आहे. म्हणूनच या वेळी अशी घाई करणार नाही. सध्यातरी गावी जाण्याची योजना नाही. आम्ही मजूर आहोत. दिवसभराच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळतो. म्हणूनच आम्ही घाई करणार नाहीत. आम्ही घरी गेलो तर आमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरज भागवणे कठीण होऊन जाईल. बंगाली सुवर्ण शिल्पी संघाचे उपाध्यक्ष राधानाथ मोदक म्हणाले, लॉकडाऊनची शक्यता असल्याने काम कमी हाेत आहे. बाजारात ६० ते ४० टक्के एवढेच काम आहे. आेमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याने काही कारागिरांमध्ये भीतीचे वातावरण दिसू लागले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन केल्यास आपण सर्व सुरक्षित राहू शकतो, अशी जागृती करण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत. झवेरी बाजारात काम करणाऱ्या कारागिरांपैकी ९० टक्क्यांहून जास्त कारागिरांनी दोन्ही डोस घेतला आहे. म्हणूनच कोरोनाचा फैलाव वाढला तरी आम्ही सुरक्षित राहू शकतो.

बहुतांश जणांना डबल डोस, भीती कमी
झवेरी बाजार पूर्णपणे बाहेर राज्यातून आलेल्या कारागिरांवर अवलंबून आहे. बहुतेक कारागिर बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशातील आहेत. येथील पाच हजार सोन्या-चांदीच्या दुकानांत ६० ते ७० हजार कारागिर काम करतात. कारागिरांची संस्था पश्चिम बंगाल वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष रंजीत दत्ता म्हणाले, जवळपास सर्व कारागिरांना दोन डोस मिळाले आहेत. त्यामुळे यावेळी भीती कमी आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement