पुणे5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदा ऐवजी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले हा एक प्रकारे पक्षासाठी त्यागच होता. आगामी काळातही पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते तयार आहेत असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
पुण्यातील घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन याठिकाणी भाजपचे आमदार ,खासदार आणि मंत्री यांच्या उपस्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बैठक घेतली त्यानंतर ते बोलत होते.
मुनगंटीवार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीस नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. यादरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रहिताचे अनेक निर्णय घेतले असून 80 कोटी जनतेला कोविड काळात 28 महिने मोफत धान्य पुरवले आहे. कोटीयावधी जनतेला मोफत लसीकरण केले आहे. रोजगार मिळावे घेऊन रोजगाराची नियुक्तीपत्रे दिलेली आहेत. 370 कलम रद्द करणे ,राम मंदिराचा निर्णय घेणे ,तिहेरी तलाक, आयुष्यमान भारत योजना आदी माध्यमातून त्यांनी देशात वेगवेगळ्या महत्वपूर्ण भूमिकांनी निभवलेला आहेत. त्यामुळे ‘घर घर चलो अभियाना’च्या माध्यमातून मोदी यांच्या कार्यकाळातील विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात घडलेल्या प्रकाराबाबत ते म्हणाले, संबंधित ठिकाणी जाणारे भाजपचे लोक नव्हते, तर कोण व्यक्ती होते हे निष्पन्न झालेले आहे. काँग्रेस यासंदर्भात अपप्रचार करत असून दंगल घडवणारे नेमके कोण आहेत हे तपासून पाहिले पाहिजे.