गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघातील खेळाडूंना खडेबोल सुनावात दिला घरचा आहेर

गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघातील खेळाडूंना खडेबोल सुनावात दिला घरचा आहेर
गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघातील खेळाडूंना खडेबोल सुनावात दिला घरचा आहेर

आयपीएल २०२२ मध्ये मंगळवारी ५७ वा सामना गुणतालिकेतील दोन अव्वल संघामध्ये खेळला गेला या लढतीत, गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ६२ धावांनी पराभव करून आयपीएल २०२२ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. लखनऊ सुपर जायंट्सला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे कारण संघाचे आणखी दोन सामने खेळायचे असताना १६ गुण आहेत. मात्र, संघाच्या मानहानीकारक पराभवानंतर मेंटॉर गौतम गंभीर चांगलाच संतापलेला दिसत होता. पराभवानंतर गंभीरचे ड्रेसिंग रूममधील भाषण व्हायरल झाले आहे. सामना संपल्यानंतर गंभीरने खेळाडूंना चांगलेच सुनावले. पराभावात काही नुकसान नाही, पण पराभव होणार आहे मानने अत्यंत चुकीचे आहे, असे गंभीर म्हणाला.

लखनऊने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये गंभीर सामन्यानंतर खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. “मला वाटतं आज आपण लढलोही नाही. आपण अशक्त दिसत होतो. खरे सांगायचे तर आयपीएलसारख्या स्पर्धेत कमकुवत दिसायला वाव नाही. पराभवात काहीच गैर नाही. एका सामन्यात एक संघ जिंकेल, एक हरेल. पण पराभव होणार मानने अत्यंत चुकीचे आहे. आज आपण या स्पर्धेत संघांना पराभूत केले आहे आणि आम्ही या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे,” असे गंभीर म्हणाला.

Advertisement

“त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हालाही त्याची अपेक्षा होती. त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. पण तुम्ही आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध खेळत आहात आणि संघांनी आपल्यालाला आव्हान द्यावे अशी आपली इच्छा आहे. आपल्याला आव्हानांचा सामना करायचा आहे आणि म्हणूनच आपण सराव करतो,” असे गंभीर पुढे म्हणाला.

लखनऊने प्रथम गोलंदाजी करताना गुजरातला ४ बाद १४४ धावांवर रोखले ते त्यांच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे. पण फलंदाजीत संघ बुडाला. दीपक हुडा वगळता संघाचा एकही फलंदाज खेळू शकला नाही आणि संपूर्ण संघ १३.५ षटकांत ८२ धावांत गारद झाला. गुजरातकडून लेगस्पिनर राशिद खानने ४ बळी घेतले.

Advertisement