गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होणार: सातारा न्यायालयाने दिला आदेश; नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप



मुंबईकाही सेकंदांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यातील जनतेला जिच्या नृत्याने वेड लावले ती गौतमी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मात्र, तिच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

गौतमी पाटील ही आपल्या डान्समध्ये अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी करत तक्रार दाखल केली होती. गौतमीने कार्यक्रमात केलेला अश्लील डान्स पाहून चहू बाजूने तिच्यावर टीका होत होती. यावर प्रतिभा शेलार यांनी गोतमी पाटील विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर सातारा कोर्टाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मृणाल कुलकर्णी यांनी गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेत साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी कुलकर्णी म्हणाल्या होत्या की कलावंताने आपली मर्यादा राखली पाहिजे, लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन फार वेगळा आहे. मात्र जर कोणी अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर दुर्दैवाने एका कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते, असे मृणाल यांनी म्हटले होते. गौतमी पाटीलच्या नृत्याचे व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाले होते, यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देखील गौतमीवर टीका केली होती. या मुळे अखेर गौतमी पाटील हिने माफी मागितली होती.

गौतमी पाटील कोण आहे?

Advertisement

गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. 26 वर्षीय गौतमीने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. एका कार्यक्रमासाठी गौतमी चांगलच मानधन घेते. गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement