गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य: तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे; अशी भाषा वापरु नये – देवेंद्र फडणवीस

गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य: तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे; अशी भाषा वापरु नये – देवेंद्र फडणवीस


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे, असे मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Advertisement

दरम्यान देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, लोकशाहीत महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. महिलांना वाव मिळाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आभार मानत आहोत. सर्व जण याला पाठिंबा देतील कुणी याला विरोध करणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

पडळकरांचे वक्तव्य काय?

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळे त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे ते. त्यामुळे त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिले नाही आणि या पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना मी पत्र दिले आहे, असे पडळकर म्हणाले.

नेमके प्रकरण काय

Advertisement

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांवर जहरी टीका केली. यामुळे भाजप आणि अजित पवार गट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे.

राज्यभरात पडळकरांविरोधात आंदोलन

Advertisement

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या विरोधात नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निषेध व्यक्त करत पडळकरांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला. नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयाच्या बाहेर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. तसेच पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाचा सविस्तर

Advertisement



Source link

Advertisement