गैरप्रकार: 12 वीच्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलले कसे? केंद्रप्रमुख म्हणतायत, ‘माहित नाही, तपासणाऱ्यांनाच ठाऊक’


छत्रपती संभाजीनगर10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून 394 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत लिहिण्यात आलेल्या करस्यू रायटींगचा गोंधळ संपता संपत नसल्याचे चित्र दिसून आले आहे. विद्यार्थी म्हणतात आमच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल कसा झाला ठाऊक नाही, त्यांच्या नंतर मॉडरेटर, केंद्रप्रमुख अन् कस्टोडियनही म्हणतायेत आम्हाला ठाऊक नाही कसे झाले? यामुळे अक्षर बदलाचे प्रकारण आणखी वेगळ्या वळणावर असून अद्यापही या प्रकारणाचा विभागीय शिक्षण मंडळास गुंता सोडवता आला नाही.

Advertisement

मात्र आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच कळेल अक्षर कसे आणि कुठेे बदलले असा पावित्रा विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आल्या. या परीक्षेतील इयत्ता बारावीच्या साडेपाचशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गैरप्रकार आढळून आला आहे.

केंद्रप्रुखांना मंडळात बोलावले

Advertisement

394 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षरात बदल आढळून आल्यानेे खळबळ उडाली आहे. आमचे हे हस्ताक्षर नाही कुणी लिहिले माहिती नाही यात आम्ही दोषी नसल्याचे विद्यार्थ्यांनी सुनावणी दरम्यान लेखी हमीपत्रात म्हटले होते. त्यानंतर शनिवारी मॉडरेटर, कस्टोडियनची देखील चौकशी करण्यात आली आहे. यानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात केंद्रप्रुखांना मंडळात बोलवण्यात आले होेते.

गुंता कायम

Advertisement

विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे चौकशीत विचारण्यात आले होते की, उत्तरपत्रिकेतील अक्षर बदलाविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? पर्यवेक्षक कोणे होते ? पेपर कुठे तपासून गेले असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी देखील असे कसे झाले हे ठाऊक नसल्याचे सांगितले. यामुळे गुंता अजूनही कायम आहे.

फिजिक्सच्या पेपरमध्येच बदल

Advertisement

उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय कोणताही मजकूर लिहिल्यास त्यास नियमानुसार आक्षेपार्हय लेखन म्हटले जाते. जसे की खुना करणे, कागद फाडणे, भावनिक लिखान आक्षेपार्हय मानले जाते. आतापर्यंत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची यात सुनावणी झाली आहे. हस्ताक्षरातील बदल हा फिजिक्सच्या पेपरमध्येच आढळून आला असल्याने त्या विषयाचे विद्यार्थ्यांनंतर विभागीय मंडळाने नोटीस पाठवून केंद्रप्रमुखांकडून खुलासा मागितला.

गडबड कुठे आणि कशी?

Advertisement

तसेच त्यांना सुनावणीसाठी देखील बोलवले होते. कळमनुरी, बीड, अंबेजोगई, पैठण येथील या उत्तरपत्रिका असून, कळमुनुरी आणि बीड येथील उत्तरपत्रिका या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर तपासण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे नेमकी गडबड झाली कुठे आणि कशी हा प्रश्न अद्यापही बोर्डासमोर अनुत्तरित असल्याचे चित्र आहे.Source link

Advertisement