गॅस रेग्युलेटर बदलण्याच्या नादात ज्येष्ठ महिलेची फसवणूक: पावेसहा लाख रुपयांचा घातला गंडा; पुण्यातील घटना


पुणे16 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुण्यात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेस गॅस रेग्युलेटर बदलण्याच्या नादात ऑनलाईन पावणेसहा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच हा प्रकार 4 जानेवारीला घडला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात निलीन अविनाश भिडे (वय-64,रा.पुणे) यांनी अनाेळखी इसमा विराेधात तक्रार दाखल केली आहे

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निलीमा भिडे या त्यांचे राहते घरी असताना, त्यांचे गॅसचा रेग्युलेटर बसत नसल्याने, त्यांनी गुगलवर एचपी कंपनीचे कस्टमर केअर नंबर सर्च केला. त्यानुसार त्यांनी ऑनलाइन मिळालेल्या नंबरचे आधारे आराेपी इसमाशी संर्पक साधला आणि रेग्युलेटर बाबत माहिती सांगितली. त्यावर आराेपीने त्यांना सुरुवातीला त्यांचे माेबाईलवर क्वीक हेल्प अ‌ॅप डाऊनलाेड करण्यास सांगुन 25 रुपये आराेपीने त्याचे खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आराेपीने तक्रारदार महिला यांचा माेबाईल हॅक करुन त्यांचे बँक खात्यातून एकूण पाच लाख 74 हजार रुपये परस्पर काढून घेत त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदरचा गुन्हाबाबत तक्रारदार यांनी उशीराने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

कुरिअर परत करण्याचे बहाण्याने 94 हजारांची फसवणूक

Advertisement

वडगावशेरी परिसरात राहणाऱ्या समीना जुजर लालजीवाला (वय-38) यांना अज्ञात आराेपीने फाेन करुन, डीटीडीसी कुरिअर मधून बाेलत असल्याचे सांगुन, रिर्टन झालेलले काचेच्या ग्लासचे पार्सल परत करण्यासाठी, माेबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे लिंक पाठवली. त्यानंतर सदर लिंक क्लिक करण्यास सांगुन तक्रारदार यांनी ओपन झालेले वेबपेजवर वैयक्तिक माहिती व बँक खात्या संर्दभातील माहिती भरण्यास सांगत, त्यांचे सहमतीशिवाय त्यांचे बँक खात्यावरुन 94 हजार 740 रुपये आराेपीने स्वत:चे बँक खात्यावर हस्तांतरित करुन तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement