पुणे2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे रेल्वे स्थानक परिसरात मॅफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने अटक केली. त्याच्याकडून १० लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. सोहेल युनूस खोपटकर (वय- 45, रा. नागपाडा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार सय्यद साहिल शेख व अझीम शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक जण पुणे स्टेशन येथील लेमन ट्री हॉटेल शेजारी एचडीएफसी बँकेसमोरून जाणाऱ्या रोडवर मॅफेड्रोन (एम.डी.) अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. सोहेल युनूस खोपटकर याच्याकडून १० लाख २८ हजार ६०० रुपयांचे ५१.४३० ग्रॅम जप्त करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक, एस. डी.नरके, पोलीस अमलदार सय्यदसाहिल शेख, अझीम शेख, शिवाजी घुले, चेतन गायकवाड, महेश साळुंखे, संदीप शेळके, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांनी केली आहे.