गुजरात टायटन्सने ६२ धावांनी लखनऊ सुपर जायंटन्सचा पराभव करत पहिला संघ ठरला पात्र

गुजरात टायटन्सने ६२ धावांनी लखनऊ सुपर जायंटन्सचा पराभव करत पहिला संघ ठरला पात्र
गुजरात टायटन्सने ६२ धावांनी लखनऊ सुपर जायंटन्सचा पराभव करत पहिला संघ ठरला पात्र

गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंटन्सचा तब्बल ६२ धावांनी पारभव करत गुणतालिकेतले आपले अव्वल स्थान पुन्हा पटकावले. लखनऊ समोर ठेवलेल्या १४५ धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ ८२ धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरातकडून फिरकीपटू राशिद खानने भेदक मारा करत २४ धावात ४ बळी घेतले. याचबरोबर त्याने टी-२० मधील आपल्या ४५० विकेट देखील पूर्ण केल्या.

भेदक माऱ्यामुळे लखनऊ सुपर जायंटन्सचा संघ ८२ धावात माघारी गेला. आयपीएल २०२२ च्या ५७ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लखनऊ सुपर जायंटन्सच्या गोलंदजांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे गुजरातची सुरूवात खराब झाली. मोहसिन खानने वृद्धीमान साहाला पाच तर आवेश खानने मॅथ्यू वेडला १० तर कर्णधार हार्दिक पांड्याला ११ धावांवर बाद करत गुजरातची अवस्था ३ बाद ५१ धावा अशी केली. लखनऊकडून फलंदाजी करताना एकट्या दीपक हुड्डालाच सर्वाधिक धावा करता आल्या. त्याने २६ चेंडूत २७ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त फक्त क्विंटन डी कॉकला ११ धावा करता आल्या. इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार केएल राहुल फक्त ८ धावा करून तंबूत परतला.

त्यानंतर सलामीला आलेल्या शुभमन गिलने चिवट फलंदाजी करत डेव्हिड मिलर सोबत अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र २४ चेंडूत २६ धावा करणाऱ्या मिलरला जेसन होल्डरने बाद केले. दरम्यान अर्धशतक पूर्ण करणाऱ्या शुभमन गिलने शेवटपर्यंत फलंदाजी करत नाबाद ६३ धावा केल्या. गिलला राहुल तेवतियाने शेवटच्या षटकात होल्डला ३ चौकार मारत गुजरातला १४४ धावांपर्यंत पोहचवले.त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. तेवतियाने १६ चेंडूत २२ धावा केल्या.

Advertisement

त्याआधी गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंटन्सकडून करण शर्माने पदार्पण केले. तर गुजरात टायटन्सकडून साई किशोरने पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाकडून शुबमन गिल याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४९ चेंडूत नाबाद ६३ धावा चोपल्या. यामध्ये ७ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त डेविड मिलरने २६ आणि राहुल तेवतियाने नाबाद २२ धावा केल्या. बाकीच्या एकाही खेळाडूला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार हार्दिक पंड्या याला फक्त ११ धावा करता आल्या.

यावेळी लखनऊ संघाकडून गोलंदाजी करताना आवेश खानने सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने ४ षटकात २६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहसिन खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. या विजयासह गुजरात संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले. या विजयानंतर त्यांचे गुण १८ झाले आहेत. तसेच, गुजरात हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा आयपीएल २०२२मधील पहिला संघ ठरला आहे.

Advertisement