गुजरात टायटन्सने पहिल्याच हंगामात आयपीएलच्या चषकावर नाव कोरले; हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार

गुजरात टायटन्सने पहिल्याच हंगामात आयपीएलच्या चषकावर नाव कोरले; हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार
गुजरात टायटन्सने पहिल्याच हंगामात आयपीएलच्या चषकावर नाव कोरले; हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार

इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा १५वा हंगामाला नवीन विजेता मिळाला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून परावभ केला आहे. कर्णधार हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिलची संयमी खेळीच्या बळावर गुजरातने आयपीएलचे विजेतपद आपल्या नावे केले आहे.अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने राजस्थानच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी न देता त्यांना १३० धावांवर रोखले होते. त्यामुळे आयपीएल २०२२ स्पर्धेचे विजेतपद मिळवण्यासाठी गुजरातला १३१ धावांचे माफक आव्हान मिळाले होते.

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना गुजरात टायटन्सने संघाने जिंकत आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे विजेतेपेद जिंकले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीत ३ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत ३४ धावा केल्या.

गुजरात समोर राजस्थानने १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १८.१ षटकांत ३ विकेट्स गमावत पूर्ण केला आणि पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे यापूर्वी असा विक्रम केवळ राजस्थान रॉयल्सने केला होता. राजस्थानने २००८ साली पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद जिंकले होते. गुजरातकडून १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच कर्णधार हार्दिक पंड्याने ३४ धावा केल्या. याशिवाय डेव्हिड मिलरने ३२ धावांची खेळी केली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३० धावा केल्या आणि गुजरातसमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले.  गुजरात टायटन्सने पहिल्या डावात शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय प्रथमत: चूकीचा ठरवला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सलामीला येत चांगली सुरुवात केली होती. पण, हे दोघे स्थिर झालेत असं वाटत असतानाच जयस्वाल १६ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. त्यानंतरही कर्णधार संजू सॅमसनने बटलरला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण सॅमसनही हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर १४ धावा करून साई किशोरकडे झेल देऊन बाद झाला.

यानंतर मात्र राजस्थानने नियमित कालांतराने विकेट्स घालवल्या. बटलर देखील ३५ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्यालाही हार्दिक पंड्याने बाद केले. शिमरॉन हेटमायरही ११ धावांवर बाद झाला. अन्य फलंदाजांनाही खास काही करता आले नाही. त्यामुळे राजस्थान संघ २० षटकांत ९ बाद १३० धावाच करू शकले. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने बटलर, हेटमायर आणि सॅमसन या राजस्थानच्या मुख्य विकेट्स घेतल्या. हार्दिक व्यतिरिक्त आर साई किशोरने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येक १ विकेट घेतली.

Advertisement

यंदाच्या आयपीएलचा पर्पल कॅप विजेता खेळाडू मिळाला आहे. आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप मिळते. राजस्थान रॉयल्स संघाचा युझवेंद्र चहलला मिळाली. तर त्याच संघाच्या खेळाडूला ऑरेंज कॅप म्हणून जोस बटलरला घोषित करण्यात आले. कॅप्टन ऑफ द फ्रंट कामगिरी करत हार्दिक पंड्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.

Advertisement