हार्दिक पांड्याचं वादळी अर्धशतक, लॉकी फर्गुसन-यश दयाल यांचा भेदक मारा, राजस्थानचा ३८ धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक आणि त्यानंतर लॉकी फर्ग्युसन आणि यश दायलाचा भेदक मारा याच्या जोरावर गुजरात टायटन्सनं विजयी चौकार खेचला. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाच सामन्यातील चार विजयासह ८ गुण मिळवत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ आता गुणतालिकेत टॉपला पोहचला. राजस्थानचा यंदाच्या हंगामातील पाचव्या सामन्यात दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा बॅटिंग करताना गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद १९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची फलंदाजी फ्लॉप ठरली. सलामीवीर जोस बटलरच्या अर्धशतकाशिवाय कुणालाही मैदानात तग धरता आला नाही. परिणामी राजस्थानला निर्धारित २० षटकात ९ बाद १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरात टायटन्सनं ३७ धावांनी सामना खिशात घातला.
कर्णधार हार्दिक पांड्याच्या वादळी अर्धशतकानंतर लॉकी फर्गुसन आणि यश दयाल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने राजस्थानचा 38 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरात संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. पाच सामन्यात गुजरातचा हा चौथा विजय आहे. १९३ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थान संघाला निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावांपर्यंत रोखलं. गुजरातकडून पदार्पणवीर यश दयाल याने तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्गुसन याने भेदक मारा करत राजस्थानच्या तीन गड्यांना तंबूत झाडले. मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
गुजरातच्या संघाने राजस्थाच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत २० षटकात १९२ धावा कुटल्या. कर्णधार हार्दिक पांड्याची नाबाद ८७ धावांची खेळी आणि त्याला अभिनव मनोहर, डेव्हिड मिलरची मिळालेली साथ याच्या जोरावर गुजरातने राजस्थानला १९३ धावांचे मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा राजस्थानकडून पाठलाग करत असताना जोस बटरलची विकेट हा चर्चेचा मुद्दा ठरला. १९३ धावांचा पाठलाग करण्यासाठी जोस बटलर मैदानात उतरताच त्याने तुफानी खेळीला सुरुवात केली. पहिल्याच षटकात तीन चौकार खेचत त्याने सामन्यात ऊर्जा भरली. अतिशय वेगाने धावा करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यानुसार एकीकडे विकेट पडत असतानाही त्याने धुलाई सुरू ठेवली पण लॉकी फर्ग्युसनने बटलरला एका यॉर्करने गप्प केले. २४ चेंडूत ५४ धावांवर खेळणाऱ्या बटलरला फर्ग्युसनने यॉर्कर चेंडूवर क्लीन बोल्ड केले. चेंडू इतका अचूक होता की बटलरही अवाक् झाल्याचे दिसून आलं.