गुजरात टायटन्सची डोकेदुखी त्याला कारण राजस्थानचे ४ खेळाडू आणि रंगाचा बेरंग करणारा पाऊस

गुजरात टायटन्सची डोकेदुखी त्याला कारण राजस्थानचे ४ खेळाडू आणि रंगाचा बेरंग करणारा पाऊस
गुजरात टायटन्सची डोकेदुखी त्याला कारण राजस्थानचे ४ खेळाडू आणि रंगाचा बेरंग करणारा पाऊस

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर १ सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२२ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा निर्णायक टप्पा आला आहे. मोहिमेच्या क्वालिफायर १ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघ आमनेसामने येणार आहेत.

कोलकाता ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणारा पहिला प्लेऑफ सामन्यावर मात्र सर्वत्र काळे ढग दाटून आले आहेत. कोलकातामध्ये नुकताच भरपूर पाऊस पडला, त्यामुळे ईडन गार्डन्स स्टेडियममधील प्रेस बॉक्सचेही नुकसान झाले. अशा तीव्र हवामानाच्या परिस्थितीत गुजरात आणि राजस्थानमधील संपूर्ण क्वालिफायर १ सामना खेळला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

Advertisement

हवामान अंदाजानुसार, मंगळवारी राजस्थान आणि गुजरात संघातील सामन्याच्या वेळी जोरदार वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अंदाजाच्या संकेतस्थळांनुसार, पहिल्या क्वालिफायरच्या संध्याकाळी मेघगर्जनेसह सरी आणि अगदी हलके वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय रविवारी आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडल्याने स्टेडियमचे आउटफिल्ड ओले होण्याची शक्यता असल्याचे समजण्यासारखे आहे. कोलकात्यात दिवसा ४८ टक्के आणि रात्री ५६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या क्वालिफायर सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. दिवसा आर्द्रता सुमारे ६७ टक्के असेल आणि रात्री ८२ टक्के पर्यंत वाढेल.

राजस्थान रॉयल्सला पात्रता फेरीत विजय मिळवून थेट फायनल गाठायचे असेल तर संघाची मदार अनेक मॅच-विनर खेळाडूंवर असेल-

Advertisement

जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल

राजस्थान रॉयल्सला त्यांचा सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. स्पर्धेतील पहिल्या ७ डावात ३ शतके झळकावणाऱ्या बटलर मागील तीन डावात फारसे योगदान देऊ शकला नाही, त्यामुळे संघाला पहिला झटका लवकर बसला. याशिवाय यशस्वीला सुरुवातीला संघर्ष करावा लागला पण पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन करत त्याने ६८, १९, ४१ आणि ५९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात या दोन्ही सलामीवीरांची भूमिका रॉयल्ससाठी महत्वाची असेल.

Advertisement

युझवेंद्र चहल

राजस्थानची सर्वात मोठी ताकद त्यांची फिरकी गोलंदाजी आहे. संघाकडे भारतीय क्रिकेटमधील युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन असे दोन अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. चहल १४ सामन्यात २६ विकेट्स घेऊन मोसमातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात चहल-अश्विनच्या जोडीने पॉवर प्लेनंतर संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. आता क्वालिफायर जिंकण्यासाठी ही जोडी पुन्हा एकदा निर्णायक ठरू शकते.

Advertisement

ट्रेंट बोल्ट

बोल्ट हा पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये राजस्थानचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. बोल्टने गेल्या अनेक सामन्यात रॉयल्ससाठी बळी घेतले आहेत. तसेच तो डेथ ओव्हर्समध्येही उपयुक्त ठरला आहे. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सविरुद्ध, ज्यांचा फलंदाजी क्रम एकदम मजबूत आहे, बोल्टवर सुरुवातीला विकेट मिळवून देण्याची अपेक्षा असेल.

Advertisement