गिरीश महाजनांच्या सूचनेनंतर धनंजय जाधवांची माघार: अहमदनगर जिल्ह्यातील चार उमेदवार पदवीधरच्या रिंगणात


अहमदनगर8 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या रणधुमाळीत नगर येथील धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. ही माघार भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानुसार घेतली असे, जाधव यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील सत्यजित तांबे, सुभाष चिंधे, ॲड. सुभाष राजाराम जंगले, पोपट सिताराम बनकर यांच्यासह नाशिक विभागातील 16 उमेदवार रिंगणात आहेत.

Advertisement

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 6 उमेदवारांनी माघार घेतली असून, 16 उमेदवार रिंगणात आहेत. डॉ. सुधीर तांबे यांच्या पक्षाचा एबी फॉर्म असतानाही, त्यांनी ऐंनवेळी खेळी करून पुत्र सत्यजित तांबे यांना पुढे केले. त्यानंतर काँग्रेसकडून दगाबाजीचे आरोप झाले. दरम्यान, तांबे यांना भाजपकडून पुरस्कृत केले जाणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला. दुसरीकडे शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पुरस्कृत केले आहे. त्यामुळे ही निवडणूक तांबे विरूद्ध पाटील अशी रंगणार आहे. दरम्यान, भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगणारे जाधव यांची मात्र, तांबेंच्या खेळीमुळे कोंडी झाली होती. भाजपकडून तांबे पुरस्कृत होतील, अशी जोरदार चर्चा असली, तरी अद्याप तांबेंनी भाजपचा पाठिंबा मागितलेला नाही.

माघारीबाबत विखे समर्थक धनंजय जाधव म्हणाले, भाजप नेते गिरीष महाजन यांची सूचना व मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानुसार, नाशिक विभाग पदवीधर मतदासंघांतून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच या पदासाठी मला पात्र समजून माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे युवा खासदार डॉ. सुजयदादा विखे यांचे आभार मानतो असे, त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement