गावसकरांच्या मते आगामी विश्वचषकापूर्वी भारतीय संघात योर्कर स्पेशलिस्टचे आगमन होणार

गावसकरांच्या मते आगामी विश्वचषकापूर्वी भारतीय संघात योर्कर स्पेशलिस्टचे आगमन होणार
गावसकरांच्या मते आगामी विश्वचषकापूर्वी भारतीय संघात योर्कर स्पेशलिस्टचे आगमन होणार

भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांनी एक मोठा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी संघात पुनरागमन करण्याच्या शर्यतीत काही खेळाडू आहे. त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन देखील आहे. नटराजन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषकात टी नटराजन भारताकडून खेळताना दिसणार आहे. असे मत सुनील गावसकर यांनी मांडले आहे.

टी नटराजनने गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर आयपीएल २०२२ च्या डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या गोलंदाजीमुळे सर्वाना हैराण केले आहे. त्याने ८ सामन्यात ८.४१ च्या इकॉनॉमी रेटने १५ विकेट घेतले आहेत. स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाइव्ह शोमध्ये गावसकर म्हणाले की नटराजन चांगली कामगिरी करत आहे. हे पाहणे चांगले वाटत आहे. कारण काही काळ असे वाटत होते की भारताने आता त्याला गमावले आहे. डेथ ओव्हर्समध्ये तो शानदार गोलंदाजी करतो.

Advertisement

तमिळनाडूच्या या वेगवान गोलंदाजाने कोविड-१९ मुळे अनेक सामने गमावले आहे. तसेच त्यानी दुखापतीला हे मागे सोडले आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड होईल असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला आहे. देशासाठी २०२०/२१ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये नटराजन शानदार पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे तो आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकला नव्हता. पण सध्या तो आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. त्यामुळेच तो शानदार गोलंदाजी करत आहे. गावस्कर पुढे म्हणाले की, आयपीएल २०२२ मध्ये नटराजन आता त्याचा ट्रेडमार्क यॉर्कर फेकण्याव्यतिरिक्त चेंडू उशिरा स्विंग करू पाहत आहे, जे पाहून छान वाटते आहे.

तसेच, त्याच्या जोडीला उमरान मलिक सारखे चालू आयपीएल हंगामात ताशी १४० ते १५० किमीच्या गतीने गोलंदाजी करणारे देखील आहेत. या गतीसह उमरान अगदी सहजतेने गोलंदाजी करत आहे. अनेकजण त्याला भारतीय संघाचा भविष्यातील महत्वाचा गोलंदाज मानू लागले आहेत. उमरानने या हंगामात अनेकदा ताशी १५० पेक्षा अधिकच्या वेगानेही गोलंदाजी केली. त्याचबरोबर मुकेश चौधरी, मोहसीन खान, अर्शदीप सिंग यांसारखे अनेक गोलंदाज भारताला विश्वचषकासाठी नवीन मिळाले आहेत.

Advertisement